Join us

प्रतीक गांधीची 'सारे जहाँ से अच्छा' वेबसीरिज येतेय, कधी आणि कुठे रिलीज होणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 15:17 IST

प्रतीक गांधी नवीन सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

प्रतिक गांधी एक लोकप्रिय अभिनेता आहे. 'स्कॅम १९९२' ही वेब सीरिज केल्यानंतर तो एका रात्रीत यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला होता. 'स्कॅम १९९२' सीरिजमधील त्याच्या अभिनयानं  प्रेक्षकांना प्रेमात पाडलं होतं. आता प्रतीक गांधी पुन्हा एकदा ओटीटीवर धमाका करण्यासाठी सज्ज झालाय. तो नवीन सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

प्रतिक गांधी यावेळी 'सारे जहाँ से अच्छा' या देशभक्तिपर वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. १३ ऑगस्ट २०२५ पासून ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये प्रतीक गांधी एका गुप्तचर अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे.  या सीरिजचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. सीरिजचं कथानक १९७० च्या दशकातील भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या खऱ्या घटनांवर आधारित आहे. 

प्रतीक गांधीसोबत सनी हिंदुजा, सुहेल नायर, तिलोत्तमा शोम, कृतिका कामरा आणि रजत कपूर यांच्याही या वेब सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. प्रतीक गांधी शेवटचा 'फुले' चित्रपटात पाहायला मिळाला होता. या चित्रपटात त्याने ज्योतिबा फुलेंची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नसला तरी IMDb वर त्याला ८.१ रेटिंग मिळालं आहे. आता चाहत्यांना त्याच्या नव्या  'सारे जहाँ से अच्छा' सीरिजची उत्सुकता लागली आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीनेटफ्लिक्स