Join us

"तारीख महत्वाची होती...", 'फुले' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलल्याने प्रतीक गांधीने व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 12:48 IST

जर सिनेमा ठरल्या दिवशी रिलीज झाला असता तर... प्रतीक गांधी स्पष्टच बोलला

प्रतीक गांधी (pratik gandhi) आणि पत्रलेखा (patralekha) यांची प्रमुख भूमिका असलेल्या आगामी 'फुले' सिनेमाची (phule movie) सध्या चर्चा आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारीत हा सिनेमा आहे. ११ एप्रिल रोजी सिनेमा रिलीज होणार होता. मात्र आता तो दोन आठवड्यांनी पुढे ढकलला आहे. सिनेमाच्या ट्रेलरमधील एका दृश्यावर ब्राह्मण समाजाने आक्षेप नोंदवला आहे. यावरुन अभिनेता प्रतीक गांधीने प्रतिक्रिया दिली आहे.

'फुले' सिनेमाच्या ट्रेलरवरुन झालेल्या गदारोळानंतर अभिनेता प्रतीक गांधी म्हणाला, "मी एके ठिकाणी शूटिंग करतो होतो तेव्हा मला समजलं की सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. मला खूप दु:ख झालं. कारण ११ एप्रिल ही खूप विशेष तारीख होती. महात्मा फुले यांची १७९ वी जयंती होती. जर सिनेमा त्या दिवशी रिलीज झाला असता तर तो इतिहासाचा भाग झाला असता. पण ठिके, जे होतं चांगल्यासाठीच होतं."

तो पुढे म्हणाला, "मेकर्सला सिनेमात काही बदल करायला सांगितले आहेत. मात्र सिनेमाला मूळ संदेश पुसला गेलेला नाही. काही लोकांनी ट्रेलरवरुनच आक्षेप घेतला आहे त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी संपूर्ण सिनेमा पाहून मगच मत नोंदवावं. ट्रेलरमध्ये पाहून संदर्भ लागत नाही."

'फुले' सिनेमा आता २५ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. अनंत महादेवन यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमता अभिनेत्री पत्रलेखासावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूडपत्रलेखासावित्रीबाई फुलेसमाजसेवक