Join us

सध्या लंडनमध्ये काय करतेय प्रार्थना बेहरे? जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 19:23 IST

प्रार्थनाने इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो व स्टोरी शेअर केली आहे. या फोटोतून समजतंय की प्रार्थना सध्या लंडनमध्ये आहे

कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच ती सोशल मीडियावर तिचे विविध फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. प्रार्थनाला सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या फोटोंचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात.

नुकताच प्रार्थनाने इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो व स्टोरी शेअर केली आहे. या फोटोतून समजतंय की प्रार्थना सध्या लंडनमध्ये आहे आणि ती कोणत्या तरी प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी गेली आहे.

प्रार्थनाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीत सुव्रत जोशी दिसतो आहे. 

तर सुव्रतने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये अभिनेता ऋषी सक्सेना दिसतो आहे.

प्रार्थना, सुव्रत व ऋषी सक्सेना कोणत्या प्रोजेक्टचं शूटिंग लंडनमध्ये करत आहेत, हे अद्याप समजू शकलेलं नाही.

प्रार्थना सध्या आपल्याला खूपच कमी चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे. ती तिच्या कुटुंबाला पहिले प्राधान्य देत असून जास्तीत जास्त वेळ हा तिच्या पतीसमवेत घालवत आहे. प्रार्थनाचे लग्न अभिषेक जावकरसोबत गेल्या वर्षी झाले. त्यांनी गोव्यात अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींच्या आणि नातलगांच्या उपस्थितीत लग्न केले.

अभिषेक हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. 'डब्बा एैस पैस', 'सॉल्ट आणि प्रेम' यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे. 

प्रार्थनाने 'पवित्र रिश्ता' या प्रसिद्ध हिंदी मालिकेद्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिची पहिल्याच मालिकेतील भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.

त्यानंतर तिने 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमाद्वारे चित्रपटसृष्टीत एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. प्रार्थनाने मालिका आणि रुपेरी पडद्यावरील आपल्या अभिनयाने रसिकांवर जादू केली आहे.  

टॅग्स :प्रार्थना बेहरेसुव्रत जोशीऋषी सक्सेना