Join us
Daily Top 2Weekly Top 5

या मराठी अभिनेत्रीने पतीसोबतचा शेअर केला रोमाँटीक फोटो, हीचा पती आहे करतो सिनेसृष्टीत करोडोंची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 16:48 IST

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या फोटोंवर फॅन्सनी केला आहे

कॉफी आणि बरंच काही, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, व्हॉट्स अॅप लग्न अशा सिनेमांमधून आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. रुपेरी पडद्यावर मराठीतील दिग्गज अभिनेत्यांसह प्रार्थना बेहरेची केमिस्ट्री चांगलीच जुळली. प्रार्थना आणि तिचा पती अभिषेक जावकर हे चित्रपटसृष्टीतील एक गोड दाम्पत्य म्हणून ओळखलं जातं. दोघांची जोडी परफेक्ट असून दोघं एकमेकांना समजून घेतात. रेशीमगाठीत अडकण्याआधी प्रार्थना आणि अभिषेक खूप चांगले मित्र होते. त्यामुळंच की त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून दोघं एकमेकांची तितकीच काळजी घेतात.

नुकताच प्रार्थना सोशल मीडियावर एक रोमाँटीक फोटो शेअर केला आहे. या फोटोला प्रार्थना एक सुदंर कॅप्शन दिले आहे, आयुष्य तुझ्यासोबत जगताना आणखी सुंदर आहे. प्रार्थनाच्या या फोटोला तिच्या फॅन्सना चांगलाच आवडला आहे. लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या फोटोंवर फॅन्सनी केला आहे. अभिषेक हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. 'डब्बा एैस पैस', 'सॉल्ट आणि प्रेम' यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे.

प्रार्थनाने 'पवित्र रिश्ता' या प्रसिद्ध हिंदी मालिकेद्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिची पहिल्याच मालिकेतील भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्यानंतर तिने 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमाद्वारे चित्रपटसृष्टीत एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. प्रार्थनाने मालिका आणि रुपेरी पडद्यावरील आपल्या अभिनयाने रसिकांवर जादू केली आहे. 

टॅग्स :प्रार्थना बेहरे