अजय देवगणच्या ‘भूज- द प्राईड ऑफ इंडिया’ या आगामी चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत. आता या चित्रपटात आणखी एका हिरोईनची एन्ट्री झालीय. होय, साऊथची लोकप्रिय अभिनेत्री प्रनीता सुभाष हे या अभिनेत्रीच नाव.प्रनीताने आत्तापर्यंत साऊथच्या अनेक चित्रपटांत काम केले आहे. ‘पोर्की’ या कन्नड चित्रपटातून प्रनीताने आपल्या अॅक्टिंग करिअरची सुरुवात केली. यानंतर तामिळ, कन्नड, तेलगू अशा सुमारे २५ दाक्षिणात्य चित्रपटात ती झळकली. २६ वर्षांची प्रनीता आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय आणि पहिल्याच चित्रपटात तिला सुपरस्टार अजय देवगणसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.
अजय देवगणच्या ‘भूज- द प्राईड ऑफ इंडिया’मध्ये झाली या साऊथ बालेची एन्ट्री!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 16:00 IST
अजय देवगणच्या ‘भूज- द प्राईड ऑफ इंडिया’ या आगामी चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत. आता या चित्रपटात आणखी एका हिरोईनची एन्ट्री झालीय. होय, साऊथची लोकप्रिय अभिनेत्री प्रनीता सुभाष हे या अभिनेत्रीच नाव.
अजय देवगणच्या ‘भूज- द प्राईड ऑफ इंडिया’मध्ये झाली या साऊथ बालेची एन्ट्री!!
ठळक मुद्देहा चित्रपट १९७१ च्या भारत-पाक युद्धादरम्यान भूज विमान तळाचे प्रभारी स्क्वॉड्रन लीडर विजय कर्णिक यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे.