Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रणितनं अखेर अभिषेक बजाजला घराबाहेर काढण्याचं खरं कारण सांगितलं, म्हणाला "हा विचार केला की..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 14:00 IST

अभिषेक बजाजच्या एविक्शनवर प्रणितनं दिलं स्पष्टीकरण

Pranit More Clarification On Choosing Ashnoor Kaur: टीव्हीवरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस १९'ची सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा आहे. आता लवकरच या शोचा ग्रँड फिनाले प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मागच्या आठवड्यात शोमध्ये डबल एविक्शन झाले, ज्यात विजेतेपदाचा दावेदार मानला जाणारा अभिषेक बजाज बाहेर पडला. तसंच नीलम गिरी हिचा बिग बॉसमधील प्रवासही संपला. गेल्या आठवड्यात कॅप्टन असलेल्या प्रणित मोरेला बिग बॉसने विशेष अधिकार दिले होते. अश्नूर कौर, अभिषेक बजाज आणि नीलम गिरी यांच्यापैकी एकाला सेव्ह करायचा अधिकार प्रणितला देण्यात आला होता. प्रणित हा अभिषेक आणि अश्नूरपैकी कोणा एकाचं नाव घेईल, हे गृहित धरलं होतं. प्रणितने अश्नूरचं नाव घेतलं. त्यामुळे अभिषेक आणि नीलमला घरातून एक्झिट घ्यावी लागली. या निर्णयानंतर घरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. यानंतर प्रणितच्या निर्णयावर अनेकांनी प्रश्न उपस्थितत केले होते. पण, तो निर्णय का घेतला, याचा खुलासा प्रणितनं केलाय. 

'बिग बॉस'मध्ये नुकत्याच झालेल्या टास्कदरम्यान स्पर्धक अमालनं अभिषेक बजाजला बाहेर काढण्याचं कारण प्रणित मोरेला विचारलं. तेव्हा प्रणितनंही आपली भूमिका स्पष्ट केली. तो म्हणाला, "मी कधीच फक्त गेमचा विचार केला नाही. मी नेहमीच काय योग्य आणि काय अयोग्य याचाच विचार केला आहे. मला तेव्हा जे पर्याय दिले, त्यात अशनूर कौर, नीलम गिरी आणि अभिषेक बजाज ही तीन नावे होती. त्यातून मला एकाला वाचवायचं होतं. त्यापैकी मी अशनूर आणि अभिषेक या दोघांना माझे मित्र मानतो. माझ्या आधीच्या अनुभवावरून मी कायमच अभिषेकला प्राधान्य दिलं".

पुढे प्रणित म्हणाला, "जेव्हा माझ्याकडे नॉमिनेशनपासून एकाला वाचवण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा मी हा विचार केला की, मी अशा माणसाची निवड करेन, जो त्याच्या मूल्यांना महत्त्व देईल आणि त्याच्याशी मी सहमत असेल. तसंच जो स्वत:बरोबर इतरांचाही विचार करतो, अशा माणसाची मी निवड करू शकेन. अशनूरबाबत जेव्हा बॉडी शेमिंग झालं होतं. तेव्हा तिनं ती परिस्थिती खूप योग्य पद्धतीनं हाताळली. त्यामुळे मला असं वाटतं, घरासाठी आणि जी मूल्य मला जाणवतात किंवा माझ्या आई-वडिलांना तेव्हा जी व्यक्ती योग्य वाटली असती त्याचा विचार करून मी अशनूरला नॉमिनेशनपासून वाचवण्याचा निर्णय घेतला".

English
हिंदी सारांश
Web Title : Pranit Reveals Real Reason for Evicting Abhishek Bajaj from Big Boss

Web Summary : Pranit More clarified why he saved Ashnoor Kaur over Abhishek Bajaj on 'Bigg Boss 19.' He valued Ashnoor's handling of body-shaming and her alignment with his values, choosing her over his friend Abhishek. Pranit said he considered what his parents would deem right.
टॅग्स :बिग बॉस १९सेलिब्रिटी