Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनाली बेंद्रेसोबत दिसत असणारी ही चिमुरडी आज गाजवतेय मराठी चित्रपटसृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 17:18 IST

या अभिनेत्रीने लहानपणी एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता, त्यावेळेसचा हा फोटो आहे.

ठळक मुद्देप्राजक्ता या व्हिडिओत खूपच क्यूट दिसत असल्याचे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. तसेच ती एक खूप चांगली नर्तिका असल्याचे तिने बालवयातच सिद्ध केले होते असे देखील त्यांचे म्हणणे आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोत आपल्याला चिमुकली प्राजक्ता दिसत असून तिच्यासोबत आपल्याला सोनाली ब्रेंद्रे आणि डिनो मोरिया यांना पाहायला मिळत आहे. हा एक रिअ‍ॅलिटी शोमधील व्हिडिओ आहे.

प्राजक्ताने एक व्हिडिओ पोस्ट करत त्यासोबत लिहिले आहे की, मी काही जुन्या गोष्टी डीलिट करत होती, तेव्हा मला काय मिळाले पाहा... मी लहान असतानाचा हा व्हिडिओ आहे (मी केवळ १४ वर्षांची असतानाचा हा व्हिडिओ आहे. क्या मस्ती क्या धूम या कार्यक्रमाची मी विजेता ठरली होती. या कार्यक्रमाच्यावेळी मी पण मराठी मुलगी आहे हे कळल्यावर, माझं नृत्य झाल्यानंतर मी दमलेय हे दिसल्यावर; सोनालीने मला एक चॉकलेट दिलं होतं. 

प्राजक्ता या व्हिडिओत खूपच क्यूट दिसत असल्याचे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. तसेच ती एक खूप चांगली नर्तिका असल्याचे तिने बालवयातच सिद्ध केले होते असे देखील त्यांचे म्हणणे आहे. प्राजक्ताचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून तीन लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

प्राजक्ता माळीला जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. तिने यानंतर हम्पी, डोक्याला शॉट यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे कुटुंबियांचे फोटो, चित्रीकरणाच्यावेळेसचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

टॅग्स :प्राजक्ता माळी