Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्राजक्ता माळी सांगतेय, या गोष्टी मी मिस करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 11:59 IST

प्राजक्ताने एक फोटो शेअर केला असून या फोटोसोबत लिहिलेल्या एका कॅप्शनमुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

ठळक मुद्देतिने नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून ती एका गोष्टीला प्रचंड मिस करणार असल्याचे तिने या पोस्टद्वारे सांगितले आहे.

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिने नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून ती एका गोष्टीला प्रचंड मिस करणार असल्याचे तिने या पोस्टद्वारे सांगितले आहे.

प्राजक्ताने एक फोटो शेअर केला असून या फोटोसोबत लिहिलेल्या एका कॅप्शनमुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने लिहिले आहे की, सेल्फी, नो फिल्टर वगैरे सगळं आहेच... पण महत्वाचं म्हणजे योग शाळेत जाऊन अष्टांग साधना करणं आणि इतर अनेक गोष्टी मी पुन्हा मिस करणार... पण सगळ्यांनी स्वतःची अधिकाधिक काळजी घ्या आणि मास्क घाला... ब्रेक द चैन...  

प्राजक्ता माळीला जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. तिने यानंतर हम्पी, डोक्याला शॉट यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या.

प्राजक्ता माळीने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्राजक्ताने विविध भूमिका साकारल्या आहेत. प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ताला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे.

टॅग्स :प्राजक्ता माळी