Join us

प्रार्थना बेहरेचा पतीसुद्धा रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज,या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 06:00 IST

वैभव तत्त्ववादी, प्रिया मराठे, सोनाली कुलकर्णीसह प्रार्थनाच्या सगळ्याच मित्र-मैत्रिणींनी तिच्या लग्नात धमाल केली. त्यांनी सगळ्यांनी प्रार्थनाच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

'कॉफी आणि बरंच काही','मिस्टर अँड मिसेस सदाचारी', 'व्हॉट्स अॅप लग्न' अशा सिनेमांमधून आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. रुपेरी पडद्यावर मराठीतील दिग्गज अभिनेत्यांसह प्रार्थना बेहरेची केमिस्ट्री चांगलीच जुळली.एकीकडे प्रार्थना रुपेरी पडदा गाजवत असताना आता तिचा पतीही रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रार्थनाचा पती अभिषेक जावकर लवकरच नवी इनिंग सुरु करणार आहे. अभिषेक लवकरच मराठी सिनेमात अभिनेता म्हणून झळकणार आहे. पतीच्या पहिल्यावहिल्या सिनेमाची आणि अभिनयातील नवी इनिंगची माहिती खुद्द प्रार्थनाने दिली आहे. 'ग्रे' या आगामी मराठी सिनेमातून अभिषेक रसिकांच्या भेटीला येणार आहे.वैभव तत्त्ववादीचा फोटो असलेले सिनेमाचे पोस्टर प्रार्थनाने सोशल मीडियावर शेअर केले आहे.२०१९ साली हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येईल.या सिनेमात अभिषेक जावकरसह अभिनेता वैभव तत्त्ववादी,पल्लवी पाटील आणि मयुरी देशमुख यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत.इन्स्टाग्रामवर प्रार्थनाने या सिनेमाची माहिती दिली आहे. 

दिग्दर्शक अभिषेक जावकरसह प्रार्थना 14 नोव्हेंबर 2017 ला  लग्नबंधनात अडकली होती. प्रार्थनाचे लग्न गोव्यात झाले होते.  प्रार्थनाचे लग्न अरेंज असून एका मॅरेज ब्यूरोच्या मदतीने तिची आणि अभिषेकची ओळख झाली. या लग्नसोहळ्याला प्रार्थनाचे कुटुंबीय, नातेवाईक यांच्यासह चित्रपटसृष्टीतील तिच्या मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती. अभिषेक जावकर हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. 'डब्बा एैस पैस', 'सॉल्ट आणि प्रेम' यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे.वैभव तत्त्ववादी, प्रिया मराठे, सोनाली कुलकर्णीसह प्रार्थनाच्या सगळ्याच मित्र-मैत्रिणींनी तिच्या लग्नात धमाल केली. त्यांनी सगळ्यांनी प्रार्थनाच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. अभिषेकच्या आवडी निवडी आणि ब-याच गोष्टी खूप कॉमन असल्यामुळे तो चांगला जोडीदार ठरू शकतो त्यामुळे अभिषेकला पसंत केल्याचे प्रार्थनाने दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. मालिका आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांवर जादू केलीच आहे. लग्नानंतरही सिनेसृष्टीत काम करणार असल्याचे प्रार्थना बेहरे हिने सांगितले. आगामी काळात हिंदी सिनेमांकडेही लक्ष केंद्रीत करण्याचे तिने ठरवले आहे. 

टॅग्स :प्रार्थना बेहरे