Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रभासचा 'राधेश्याम' पुन्हा चर्चेत, काही मिनीटांच्या सीनसाठी कोट्यावधींचा केला गेला खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 16:09 IST

प्रभासचा 'राधेश्याम' सिनेमा हा सगळ्यात महागडा प्रोजेक्ट आहे.‘राधेश्याम’ हा एक बहुभाषिक सिनेमा असणार आहे जो हिंदी, तेलुगू, इंग्लिश अशा वेगवेगळ्या 6 भाषेत प्रदर्शित करण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून  दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास 'राधे श्याम' या सिनेमामुळे चर्चेत आहे. पुन्हा एकदा या सिनेमाच्या माध्यमातून तो  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री पूजा हेगडे स्क्रिन शेअर करणार आहे. त्यामुळे प्रभास आणि पूजा हेगडे या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे नेहमीच अॅक्शन आणि स्टंट हिरोच्या भूमिकेत दिसणारा प्रभास या सिननेमात रोमँटिक हिरोची भूमिका साकारणार आहे. पुन्हा एकदा प्रभास चर्चेत आला आहे.  

बिग बजेट असणा-या सिनेमात कोणत्याही गोष्टीमध्ये कमतरता राहू नये म्हणून बारकाईने लक्ष दिले जात आहे. त्यामुळेच प्रभासच्या कॉस्ट्यूमसाठी निर्मात्यांनी ६ कोटींचा खर्च केल्याचं समोर आलं होतं त्यानंतर आता सिनेमातल्या एका सीनचीही जोरदार चर्चा होत आहे. या काही मिनिटांच्या सीनसाठी कोट्यवधींचा खर्च केल्याचं बोललं जात आहे. काही मिनिटांच्या सीनसाठी जवळपास १.५ कोटी रुपयांचा खर्च केला आहे.

हा सीन खरंतर  नयनरम्य रोम शहरातील आहे पण याचं शूटिंग मात्र भारतात केलं गेलं आहे. पडद्यावर पाहताना कुठेही डमी वाटू नये म्हणून भारतातच रोम शहराचा हुबेहुब वाटावा असा सेट तयार करण्यात आला. सेटवर प्रचंड मेहनत घेण्यात आली आहे.  

प्रभासचा 'राधेश्याम' सिनेमा हा सगळ्यात महागडा प्रोजेक्ट आहे.‘राधेश्याम’ हा एक बहुभाषिक सिनेमा असणार आहे जो हिंदी, तेलुगू, इंग्लिश अशा वेगवेगळ्या 6 भाषेत प्रदर्शित करण्यात येणार आहे. 30 जुलै 2021 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. प्रभास आणि पूजा व्यतिरिक्त या चित्रपटात सचिन खेडेकर, भाग्यश्री, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. 

राधेश्याम सिनेमाशिवाय प्रभास आदिपुरूष चित्रपटात झळकणार आहे. हा बिग बजेट चित्रपट असून या चित्रपटाचे बजेट ४०० कोटी रुपये आहे. ओम राऊतच्या या चित्रपटात प्रभास राम आणि सैफ अली खान लंकेशच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच सलार या चित्रपटातही तो दिसणार आहे. या चित्रपटातील तिचा लूक नुकताच रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटात प्रभास अॅक्शन करताना दिसणार आहे.

टॅग्स :प्रभासपूजा हेगडे