Join us

'हीरामंडी'चा दमदार ट्रेलर रिलीज, शाही मोहल्ल्यातील वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांची सांगणार कथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 20:00 IST

Heeramandi Trailer : संजय लीला भन्साळी यांची बहुप्रतिक्षित हीरामंडी द डायमंड बझार या मालिकेचा ट्रेलर लाँच झाला आहे. पाकिस्तानच्या शाही परिसर हिरामंडीवर आधारित या मालिकेत प्रेम, शक्ती आणि स्वातंत्र्याची लढाई पाहायला मिळते.

संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची बहुप्रतिक्षित 'हीरामंडी द डायमंड बझार' (Heeramandi The Diamond Bazar) या मालिकेचा ट्रेलर लाँच झाला आहे. पाकिस्तानच्या शाही परिसर हिरामंडीवर आधारित या मालिकेत प्रेम, शक्ती आणि स्वातंत्र्याची लढाई पाहायला मिळते. वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या जीवनावर प्रकाश टाकतो. यात गणिकांची जीवनशैली आणि देशाच्या स्वातंत्र्यादरम्यानचा त्यांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. ही मालिका तुम्हाला त्या काळात घेऊन जाईल जेव्हा आपला देश स्वातंत्र्यासाठी लढत होता.

सीरिजच्या ट्रेलरमध्ये असे दाखवण्यात आले आहे की मल्लिकाजन (मनीषा कोईराला) हीरामंडीमध्ये एकटी आहे, जी उच्च वर्गातील वेश्यांच्या घरावर राज्य करते. ती कोणतीही भीती न बाळगता तिची राजवट चालवते, पण एके दिवशी तिच्या जुन्या शत्रूची मुलगी फरीदान (सोनाक्षी सिन्हा) हिच्या आगमनाने तणावाचे वातावरण निर्माण होऊ लागते.

ब्रिटीश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या क्रांतिकारकांमुळे हे शहर देखील अशांत आहे. मल्लिकाजानच्या मुलींपैकी एक बिब्बोजान (अदिती राव हैदरी) स्वातंत्र्यलढ्यात सामील होते. दरम्यान मल्लिकाजानची धाकटी मुलगी आलमजेब (शरमीन सहगल) ताजदार (ताहा शाह बदुशा) याच्याशी प्रेमाची स्वप्ने पाहते, जो नवाबचा मुलगा (कुलीन) आहे आणि ती हिरामंडीतून बाहेर पडू इच्छिते.

हीरामंडीची स्टारकास्ट'हीरामंडी'च्या सेटवरून त्याची स्टारकास्टही बरीच मोठी आहे. या मालिकेत सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, आदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, अध्यायन सुमन, शेखर सुमन, फरदीन खान, संजीदा शेख आणि ताहा शाह बदुशा आपली जादू पसरवताना दिसणार आहेत. 'हीरमंडी : डायमंड बझार' ही सीरिज १ मे रोजी भेटीला येणार आहे.

टॅग्स :संजय लीला भन्साळीमनिषा कोईरालाआदिती राव हैदरीसोनाक्षी सिन्हा