Join us

निळे डोळे, गोरीपान; ९० च्या दशकातील खलनायकाच्या लेकीवर खिळल्या नजरा; ओळखलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 14:59 IST

'कोई मिल गया' मधला व्हिलन, आता बघा कसा दिसतो?

'कोई मिल गया' या गाजलेल्या सिनेमाचा खलनायक आठवतोय? ९० च्या दशकात व्हिलनच्या भूमिकांमध्ये दिसलेला हा अभिनेता आहे रजत बेदी. १० वर्षांनंतर तो पुन्हा स्क्रीनवर परतला आहे. आर्यन खानने त्याला पुन्हा आणलं आहे. 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये रजत बेदीची भूमिका आहे. नुकत्याच झालेल्या सीरिजच्या प्रीमियरला रजत बेदीने कुटुंबासह हजेरी लावली. यावेळी त्याच्या लेकीवर सर्वांच्या नजरा खिळल्या. 

कॅनेडियन-भारतीय अभिनेचा रजत बेदी दिसायला हँडसम, डॅशिंग आणि स्टायलिश आहे. त्याचे उंच, घारे डोळे,  धारदार नजर, स्मार्ट लूक पाहून तरुणी घायाळ व्हायच्या. पण तो पडद्यावर खलनायकी भूमिकेतच दिसायचा. रजत बेदीला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोघंही दिसायला अगदी वडिलांसारखेच आहेत. लेकीचं नाव वेरा बेदी आहे. तिच्या डोळ्यांचा रंग, तजेलदार त्वचा,  आणि एकूणच व्यक्तिमत्व पाहून ती अगदी वडिलांवरच गेली असल्याचं दिसतं. वेराने टाईट टॉप आणि जीन्स  घातलेली आहे. या आऊटफिटमध्येही तिचं सौदर्य खुलून आलं आहे.

वेरा बेदीही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार का अशी चर्चा आता सुरु झाली आहे. ती जर इंडस्ट्रीत आली तर अनेक अभिनेत्रींना सौंदर्यात ती टक्कर देईल यात शंका नाही. रजत बेदी अनेकदा लेकीसोबत व्हिडिओ शेअर करतो. तर वेरा बेदीचं इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट आहे. तर रजतच्या मुलाचं नाव विवान आहे. तोही दिसायला हँडसम आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूडवेबसीरिज