Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूजा सावंतने पतीसोबत ऑस्ट्रेलियात साजरा केला लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा, फोटोत दिसली घराची झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 14:11 IST

लग्नानंतर पूजाने पहिला गुढीपाडवा साजरा केला आहे. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

मराठी सिनेसृष्टीतील कलरफुल म्हणजेच अभिनेत्री पूजा सावंत. काही दिवसांपूर्वीच पूजाने लग्नाच्या बेडीत अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली. पूजाने मित्रपरिवार आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधली. आता लग्नानंतर पूजाने पहिला गुढीपाडवा साजरा केला आहे. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

पूजाने पतीसोबत ऑस्ट्रेलियातील घरी गुढी उभारत लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा केला. गुढीपाडव्यासाठी पुजाने खास पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. गळ्यात मंगळसूत्र आणि हातात हिरव्या बांगड्या असा नववधूचा लूक केला होता. गुढीपाडव्यासाठी पूजाने खास पुरणपोळी, बटाट्याची भाजी, वरण भात, भजी आणि खीर असा बेत केला होता. गुढीपाडव्याचे खास फोटो शेअर करत पूजाने चाहत्यांना गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये पुजाच्या ऑस्ट्रेलियातील घराची झलक पाहायला मिळत आहे. 

दरवर्षी अनेक मराठी सेलिब्रिटी गुढीपाडव्याचा सण मोठा उत्साहात साजरा करताना दिसतात. घराबाहेर गुढी उभारत मराठी कलाकार नववर्षाचं स्वागत करतात. पूजा सावंतबरोबरच ऋतुजा देशमुख, रितेश देशमुख, हेमांगी कवी, हार्दिक जोशी-अक्षया देवधर, शिवानी सुर्वे-अजिंक्य ननावरे या कलाकारांनीही गुढी उभारत गुढीपाडवा साजरा केला. 

टॅग्स :पूजा सावंतगुढीपाडवासेलिब्रिटी