Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूजा हेगडे मिस्ट्री मॅनसोबत झाली स्पॉट, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 13:05 IST

Pooja Hegde : बॉलिवूड आणि साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे सध्या चर्चेत आहे. अचानक सोशल मीडिया यूजर्समध्ये तिच्या लव्ह लाईफची चर्चा सुरू झाली आहे.

बॉलिवूडच्या कॉरिडॉरमधून एक क्रिस्पी गॉसिप समोर येत आहे. बॉलिवूड आणि साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) सध्या चर्चेत आहे. अचानक सोशल मीडिया यूजर्समध्ये तिच्या लव्ह लाईफची चर्चा सुरू झाली आहे. नुकतीच पूजा हेगडेच्या रिलेशनशिप स्टेटसची चर्चा आहे. खरेतर, काल रात्री अभिनेत्री एका मिस्ट्री बॉयसोबत स्पॉट झाली होती. पूजा हेगडेसोबतचा हा मिस्ट्री बॉय पाहून आता हा मुलगा कोण आहे आणि या दोघांमध्ये काय चालले आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

याआधी पूजा हेगडेचे नाव बॉलिवूडचा दबंग सलमान खानसोबतही जोडले गेले आहे. जेव्हा दोघेही 'किसी का भाई किसी की जान'चे शूटिंग करत होते, तेव्हा ते एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली होती. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, पूजा हेगडे आणि सलमान खान डेट करत आहेत. मात्र, दोघांनीही या अफवांवर कधीही प्रतिक्रिया दिली नाही.

मिस्ट्री बॉयसोबत अभिनेत्री दिसली एकाच कारमध्ये पण आता या मिस्ट्री बॉयसोबत पूजा हेगडेला पाहिल्यानंतर चाहत्यांनाही उत्सुकता लागली आहे. त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहतेउत्सुक आहेत. पूजा हेगडे शुक्रवारी रात्री या व्यक्तीसोबत डिनरला गेली होती. एवढेच नाही तर दोघेही एकाच गाडीतून घरी निघाले. यावेळी पूजा कॅज्युअल लूकमध्ये दिसली. तिने पांढरा शर्ट आणि जीन्स घातली होती. तर तिचा मिस्ट्री बॉयही ब्लॅक टी-शर्ट आणि कॅपमध्ये दिसला. 

ही व्यक्ती कोण आहे?एका व्यक्तीने विचारले, 'हा कोण आहे?' कोणी म्हणाले, 'ते रिलेशनशिपमध्ये आहेत का?' तर कोणी विचारले, 'त्यांचे काय चालले आहे?' व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणीतरी लिहिले, 'रोहन मेहरा तिचा बॉयफ्रेंड आहे. माझे तिच्यावर खूप प्रेम आहे, पूजा आणि रोहनला नजर लागू नये.'' पापाराझींनी ज्या व्यक्तीसोबत अभिनेत्रीला कैद केले आहे तो दुसरा कोणी नसून रोहन मेहरा आहे. रोहन हा अभिनेता विनोद मेहरा यांचा मुलगा असून तो त्याच्या वडिलांप्रमाणेच व्यवसायाने अभिनेता आहे. पण तो पूजाला डेट करत आहे आणि ती डिनर डेट होती, हे निश्चितपणे सांगता येणार नाही. कदाचित दोघे फक्त चांगले मित्रही असतील. 

टॅग्स :पूजा हेगडे