Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर या अभिनेत्रीच्या मुलीच्या फोटोने लावलीय आग, सगळीकडे आहे तिचीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 15:41 IST

या अभिनेत्रीच्या मुलीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला नसला तरी ती खूप मोठी स्टार बनली आहे.

ठळक मुद्देआलिया तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे फोटो नियमित अपलोड करीत असते. या फोटोंमध्ये तिचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळतो. तिच्या सगळ्याच फोटोंना प्रचंड लाईक्स मिळत असून तिचे फॅन्स या फोटोवर भरभरून कमेंट करतात.

पूजा बेदीने एकेकाळी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या. तिच्या बोल्डनेसची नव्वदीच्या दशकात चांगलीच चर्चा झाली होती. आता तिच्या पावलावर पाऊल टाकत तिची मुलगी देखील लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे. तिचे मुलगी देखील प्रचंड ग्लॅमरस असून तिचा बोल्ड अंदाज नेटिझन्सना चांगलाच भावतो. 

अभिनेत्री पूजा बेदीची लेक आलिया फर्निचरवाला बॉलिवूडमध्ये डेब्यू न करताच खूप मोठी स्टार बनली आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटला तीन लाख ९२ हजार फॉलोअर्स असून सोशल मीडियावर तिची कित्येक फॅन पेजस आहेत.

तिने न्यू यॉर्क युनिर्व्हसिटीमध्ये एक वर्षाचा दिग्दर्शनाचा कोर्स केला असून न्यू यॉर्क फिल्म अकॅडमीमध्ये एक वर्षाचा अभिनयाचा देखील कोर्स केला आहे. आता ती भारतात परतली असून, बॉलिवूडमध्ये काम करण्यास सज्ज झाली आहे. सध्या ती अभिनय, कथ्थक, डान्स आणि गायन क्लासेस घेत आहे.

आलिया तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे फोटो नियमित अपलोड करीत असते. या फोटोंमध्ये तिचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळतो. तिच्या सगळ्याच फोटोंना प्रचंड लाईक्स मिळत असून तिचे फॅन्स या फोटोवर भरभरून कमेंट करतात. पण काही वेळा तिच्या या बोल्ड फोटोंमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात येते. 

त्यामुळेच आलियाने ट्रोलर्सला उत्तर देण्यासाठी एक दमदार ब्लॉगही लिहिला होता. ‘जर माझे क्लीवेज दिसत असतील तर याचा अर्थ असा नाही की, मी तुम्हाला परवानगी देत आहे. माझ्या शरीराच्या वाढत्या अवयवांपेक्षाही खूप काही आहे. त्यामुळे लोकांनी उगाचच माझ्याविषयी त्यांचे दूषित मत तयार करू नये.’ दरम्यान, आलियाचा हा बिंधास्त स्वभाव पाहता ती बॉलिवूडमध्ये धमाका करेल यात शंका नाही.

टॅग्स :आलिया फर्निचरवालापूजा बेदी