Join us
Daily Top 2Weekly Top 5

होणा-या नव-यासोबत रोमॅन्टिक झाली ही अभिनेत्री, 49 व्या वर्षी केला साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 11:11 IST

व्यवसायिक आयुष्यापेक्षा तिचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले. तिची अफेअर्सची बरीच चर्चा झाली.

ठळक मुद्देपूजाने जो जीता वही सिकंदर, लुटेरे, आतंक ही आतंक, फिर तेरी कहानी याद आई अशा चित्रपटांत काम केले आहे.

पूजा बेदी म्हणजे एकेकाळची बोल्ड अभिनेत्री. ‘जो जीता वहीं सिकंदर’ या चित्रपटाने पूजाला खरी ओळख दिली. या चित्रपटात पूजा आमिर खानसोबत लिपलॉक करताना दिसली होती. तिच्या या बोल्ड लिपलॉक सीनची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती.  त्याआधी तिची कंडोमची जाहिरात अशीच चर्चेत आली होती. ‘जो जीता वहीं सिकंदर’नंतर पूजा चर्चेत आली खरी. पण यानंतर  तिचा एकही चित्रपट चालला नाही. कबीर बेदीसारख्या मोठ्या स्टारची मुलगी हे वलयही तिच्या कामी आले नाही. पूजाने ८ चित्रपट केलेत. पण ते सगळेच फ्लॉप झालेत. पूजाच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा तिचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले. तिची अफेअर्सची बरीच चर्चा झाली. पाच जणांशी तिचे नाव जोडले गेले. 

1994 मध्ये तिने फरहान फर्निचरवालासोबत लग्न केले. पण लग्नाच्या 12 वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट झाला. या दोघांना उमर व आलिया अशी दोन मुले आहेत.

याचवर्षी  फेब्रुवारीमध्ये वयाच्या 49 व्या वर्षी पूजाने मॅनेक कॉन्ट्रक्टरसोबत साखरपुडा केला. लवकरच पूजा व मॅनेक लग्नबंधनात अडकणार आहेत. तूर्तास हे कपल गोव्यात सुटीचा आनंद लुटत आहेत. दोघांनी गोव्याच्या समुद्र किना-यावरचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

मानेक हे गोव्याचेच असून एकाच शाळेत शिकलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यात सुरुवातीपासूनच चांगली मैत्री आहे. त्यांचा नुकसाच साखरपूडा झाला असून ते लग्नही करणार आहेत.

पूजाने जो जीता वही सिकंदर, लुटेरे, आतंक ही आतंक, फिर तेरी कहानी याद आई अशा चित्रपटांत काम केले आहे.

टॅग्स :पूजा बेदी