Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जी होणार आई, बाळाच्या जन्मानंतर करणार पारंपारिक पद्धतीने लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 15:29 IST

सोशल मीडियावर पूजाने आपल्या फॅन्ससोबत ही आनंदाची बातमी शेअर केली.

टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जीच्या फॅन्ससाठी एक गुडन्यूज आहे. लवकरच पूजा आई होणार आहे. पूजा बनर्जीने एप्रिल महिन्यामध्ये टीव्ही अभिनेता कुणाल वर्मासोबत लग्नाच्या बेडीत अडकली. दोघे दीर्घकाळ एकमेकांना डेट करत होते. पूजा आणि कुणाल त्यांच्या पहिल्या बाळाच्या स्वगतासाठी उत्सुक आहेत. सोशल मीडियावर पूजाने आपल्या फॅन्ससोबत ही आनंदाची बातमी  शेअर केली.  फोटो शेअर करताना पूजाने तीन लोकांचे आभार मानले आहेत. 

पूजाच्या प्रेग्नेंसीची गोड बातमी कळल्यावर सेलिब्रेटी, मित्र परिवार आणि फॅन्सनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार एका मुलाखती दरम्यान पूजा म्हणाली, ''कुणाल आणि मी आमच्या आयुष्यातील या नवीन आणि सुंदर अनुभवाबद्दल खूप आनंदी आहोत. मी याक्षणी खूप आनंदित आहे आणि मी माझा वेळेचा आनंद घालवते आहे. मी एप्रिल महिन्यांपासून अपार्टमेंटच्या बाहेर गेलेली नाही.'' 

पूजा बॅनर्जीने लॉकडाऊनमध्ये तिचा प्रियकर कुणाल वर्माशी लग्न केले. कुणाल आणि पूजाने कोर्ट मॅरेज केले आहे.  रिपोर्टनुसार पूजा म्हणाली, आपल्या मुलाच्या जन्मानंतर पारंपरिक पद्धतीने लग्न करण्याची इच्छा तिची आहे. पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा जवळपास १० वर्षे  रिलेशनशीपमध्ये होते. 

पूजा आणि कुणाल यांची पहिली भेट 'तुझ संग प्रीत लगाई सजना'च्या सेटवर झाली होती. हळूहळू यांच्यात जवळीक निर्माण झाली. या मालिकेव्यतिरिक्त पूजाने छोट्या पडद्यावर 'सर्वगुण संपन्न', 'कबूल है', 'कॉमेडी नाइट्स बचाओ', 'झलक दिखला जा 8', 'कॉमेडी क्लासेस' या शोजमध्ये काम केले आहे. 

टॅग्स :पूजा बॅनर्जी