Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचा ट्रेलर OUT, 5 एप्रिलला होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 20:00 IST

हीराबेन म्हणजेच मोदींच्या आईची भूमिका अभिनेत्री जरीना वहाब ही भूमिका साकारणार आहे. तर किशोरी शहाणे या इंदिरा गांधी यांची भूमिकेत दिसणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाची सा-यांना उत्सुकता आहे. चित्रपटात पंतप्रधान मोदींची मध्यवर्ती भूमिका अभिनेता विवेक ओबेरॉय साकारत आहे. याच चित्रपटात विवेकने साकारलेल्या मोदींच्या जीवनातील विविध टप्प्यावरील लूक समोर आले  होते. आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.  

चित्रपटात २०१४ मधील निवडणुका ते पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवासही दाखवला जाणार आहे. या चित्रपटात विविध दमदार राजकीय व्यक्तीरेखा पाहायला मिळणार आहेत. अभिनेता मनोज जोशी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भूमिका साकारणार आहेत. मेरी कोम आणि सरबजीत चित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमारने  या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

तसेच हीराबेन म्हणजेच मोदींच्या आईची भूमिका अभिनेत्री जरीना वहाब ही भूमिका साकारणार आहे. तर किशोरी शहाणे या इंदिरा गांधी यांची भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेत्री बरखा बिष्ट मोदींची पत्नी जसोदाबेन ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात मोदींच्या जीवनातील अशाच काही माहिती नसलेल्या गोष्टी पहिल्यांदाच जगासमोर येणार आहेत. 

टॅग्स :पी. एम. नरेंद्र मोदीविवेक ऑबेरॉय