पंतप्रधान मोदी यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय मोदींच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आणि सर्वाधिक चर्चा रंगली ती चित्रपटातील विविध पात्रांची. नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री, अमित शहा यांची व्यक्तिरेखा कोण साकारणार, हे लोकांना कळले. आता या चित्रपटातील आणखी एका पात्राविषयीची माहिती समोर आली आहे. होय, या चित्रपटात प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे पात्र असणार आहे. हे पात्र अभिनेता बोमन इराणी साकारणार आहे.
‘पीएम नरेंद्र मोदी’त बोमन इराणींची एन्ट्री, साकारणार हे पात्र!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 13:38 IST
नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री, अमित शहा यांची व्यक्तिरेखा कोण साकारणार, हे लोकांना कळले. आता या चित्रपटातील आणखी एका पात्राविषयीची माहिती समोर आली आहे.
‘पीएम नरेंद्र मोदी’त बोमन इराणींची एन्ट्री, साकारणार हे पात्र!!
ठळक मुद्देया चित्रपटात नरेंद्र मोदी यांच्या राजकिय जीवनातील महत्त्वाच्या घडामोडींवर प्रकाश टाकण्यात येणार आहे.