Join us
Daily Top 2Weekly Top 5

डिलिव्हरी आधी जीममध्ये वर्कआऊट करताना दिसली नीति मोहन, यूजर म्हणाले- प्लीज अपना ध्यान रखिए

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 13:16 IST

बॉलिवूड सिंगर नीति मोहन लवकरच आई होणार आहे.

बॉलिवूड सिंगर नीति मोहन लवकरच आई होणार आहे. नीति मोहन आणि निहार पांड्या इंडस्ट्रीमधील लोकप्रिय कपल पैकी एक आहे.  नीति तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. सेलिब्रिटी कपल आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी खूप उत्सुक आहेत. नीति तिच्या फिटनेसकडे ही बरेच लक्ष देते आहे. 

नीति मोहन जिममध्ये बराच वेळ घालवते आहे जेणेकरून ती स्वत: ला फिट ठेऊ शकले आणि डिलिव्हरीसाठी पूर्णपणे तयार राहू शकेल. अलीकडेच तिने स्वत: चा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती जिममध्ये वर्कआउट करताना दिसते आहे. त्याने गुलाबी रंगाचा टॉप आणि गडद निळा पँट घातली आहे. नीति स्ट्रेचिंग वर्कआउट्सवर जास्त लक्ष केंद्रित करताना दिसते आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना नीतिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "आई होण्यापूर्वी पूर्णपणे फॉर्ममध्ये." व्हिडिओला काही तासांतच 1 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. चाहत्यांसह सेलिब्रेटींनी तिच्या या व्हिडीओ कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. एका यूजरने नीतिला कृपया स्वतःची काळजी घे. अशी कमेंट् केली आहे. 

2019मध्ये झाले होतं लग्न निती मोहन आणि निहार पंड्या यांनी 15 फेब्रुवारी 2019 रोजी सात फेरे घेतले होते. दोघांचं लव्हमॅरेज आहे. या शाही लग्नाची चर्चा हैदराबादमध्ये खूूप झाली होती. लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नीति एक गोड गळ्याची गायिका आहे, तर निहार मणिकर्णिकासारख्या चित्रपटांचा एक भाग असलेले एक उत्तम अभिनेता आहे., स्टुडंट ऑफ द इयरसह बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. विशाल शेखरने या गाण्याचे संगीत दिले होते. त्यानंतर त्याने जब तक है जान का जिया रे हे गाणे गायले. याशिवाय तिने अनेक हिट गाणी दिली आहेत. निती संगीताच्या क्षेत्रात सक्रिय असताना तिची बहीण शक्ती मोहन आणि मुक्ती मोहन डान्सर आहेत.

टॅग्स :नीति मोहन