Join us
Daily Top 2Weekly Top 5

'साहो' च्या दुबईतील सेटवरुन प्रभासचे फोटो लिक, बघा प्रभासचा अॅक्शन लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 15:44 IST

प्रभास पुन्हा बॉक्स ऑफिसवर धमाका करु शकतो. पण सध्या या सिनेमाच्या सेटवरुन लिक झालेले प्रभासचे फोटो चर्चेचा विषय ठरत आहे.

मुंबई : बाहुबली आणि बाहुबली 2 या दोन सिनेमांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या प्रभासच्या आगामी साहो बाबत त्याच्या चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. बाहुबली नंतर पुन्हा एकदा प्रभास प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येतो आहे. या सिनेमाच्या माध्यमातून प्रभास पुन्हा बॉक्स ऑफिसवर धमाका करु शकतो. पण सध्या या सिनेमाच्या सेटवरुन लिक झालेले प्रभासचे फोटो चर्चेचा विषय ठरत आहे.

 

प्रभासचा या सिनेमातील लूक फारच पसंत केला जातो आहे. कारण बाहुबलीपेक्षा त्याचा या सिनेमातील लूक फारच वेगळा आणि ढासू आहे. या सिनेमाच्या कथेबाबत फारच सीक्रेट ठेवलं जात आहे. पण अशातच लिक झालेल्या या फोटोंमुळे अनेकांना प्रभासचा अॅक्शन मूड बघायला मिळाला आहे. 

दुबईत होत असलेल्या एका खास सीनच्या शू़टिंग वेळचे फोटो लिक झाले आहेत. या सिनेमात अभिनेत्री श्रद्धा कपूर ही प्रभाससोबत दिसणार आहे. तेच एवलिन शर्माही टॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हा सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

टॅग्स :बॉलिवूडश्रद्धा कपूर