Join us

सिद्धार्थ जाधवच्या बालपणीच्या दप्तरावरचं चित्र जिवंत होऊन आलं समोर , वाचा नेमकं काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 12:05 IST

अभिनेता सिद्धार्थ जाधव कधी अतरंगी स्टाइलमुळे तर कधी आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत येत असतो.

अभिनेता आणि कॉमेडी किंग म्हणजे सिद्धार्थ जाधव. कॉमेडीच नाही तर आपल्या अभिनय कौशल्याने सिद्धार्थने रसिकांची मनं जिंकली आहे. त्याने फक्त मराठी सिनेइंडस्ट्रीतच नाही तर हिंदीतही आपली छाप उमटविली आहे. दरम्यान सलमान खानचा आगामी चित्रपट राधेः युअर मोस्ट वॉण्टेड भाईमध्ये सिद्धार्थ जाधव दिसणार आहे. त्याने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमधून समजते आहे. सिद्धार्थने त्याचा एक किस्सा सोशल मीडियावर सांगितला आहे.

सिद्धार्थ जाधवने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता, कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक प्रभू देवासोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबत त्याने लिहिले की, प्रभूदेवा....त्याचं ‘हम से है मुकाबला’ मधलं चित्र असलेलं दप्तर घेऊन शाळेत जायचो, दप्तरावरचं चित्र जिवंत होऊन समोर येईल असं कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं.. पण यावेळेस दप्तरावरचं स्वप्न घेऊन जगणाऱ्या मला दप्तराच्या बाहेरच खूप काही शिकायला मिळालं..कलाकार म्हणून नेहमीच वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली काम करायची संधी मिळत असते.. आणि मी ती संधी सहसा सोडत नाही.

रुपेरी पडदा, रंगभूमी आणि छोटा पडदा या तिन्ही माध्यमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. सिद्धार्थने केवळ मराठीच नाही तर हिंदीतही अजय देवगण, रणवीर सिंगसारख्या बड्या स्टार्ससोबत रुपेरी पडदा गाजवला आहे.

त्यानंतर आता तो अभिनेता सलमान खानसोबतही स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्यामुळे त्याचे चाहते त्याला सलमान खानसोबत काम करताना पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.  

टॅग्स :सिद्धार्थ जाधवप्रभू देवासलमान खान