Join us

तुझ्यात जीव रंगला..! अक्षया देवधर-हार्दिक जोशीच्या लग्नाला १ वर्ष पूर्ण, दोघांनी शेअर केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 12:49 IST

1 / 9
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत पाठक बाई आणि राणादाच्या भूमिकेतून अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी घराघरात पोहचले. या मालिकेतून त्या दोघांनी तुफान लोकप्रियता मिळवली आहे.
2 / 9
गेल्या वर्षी २ डिसेंबर रोजी ही रिल लाइफ जोडी खऱ्या आयुष्यात लग्नाच्या बेडीत अडकली. आज त्यांच्या लग्नाला १ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने त्या दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
3 / 9
अभिनेत्री अक्षया देवधरने इंस्टाग्रामवर हार्दिक सोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, १ वर्ष सरले, आता आयुष्यभर एकत्र राहू. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक जोशी.
4 / 9
अक्षयाने या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, माझा नवरा, माझा जोडीदार, माझा प्रियकर आणि माझा जिवलग मित्र असल्याबद्दल धन्यवाद. माझं तुझ्यावर प्रेम आहे.
5 / 9
तर हार्दिक जोशीनेदेखील त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, तू माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट आहेस. एक वर्ष एकत्र आनंदी गेल्यासाठी हार्दीक शुभेच्छा, माझे प्रेम अक्षया देवधर.
6 / 9
अक्षया आणि हार्दिकच्या पोस्टवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
7 / 9
२ डिसेंबर २०२२मध्ये अक्षया आणि हार्दिकने लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाची सगळीकडे चर्चा रंगली होती.
8 / 9
पाठकबाई आणि राणादाने खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधल्याने चाहतेही आनंदी होते. त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
9 / 9
दरम्यान, हार्दिक लवकरच वेडात मराठे वीर दौडले सात या ऐतिहासिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो स्टार प्रवाहवरील 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. तसेच तो जाऊबाई गावात या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
टॅग्स :अक्षया देवधरहार्दिक जोशीतुझ्यात जीव रंगला