'या' इटालियन मॉडेलमुळे मोडला सैफ-अमृताचा संसार?; Extra Marital Affair पडलं महागात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 11:51 IST
1 / 10गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान विविध कारणांमुळे चर्चेत येत आहे. नुकताच त्याचा 'बंटी और बबली 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.2 / 10गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान विविध कारणांमुळे चर्चेत येत आहे. नुकताच त्याचा 'बंटी और बबली 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.3 / 10सैफने २०१२ मध्ये अभिनेत्री करीना कपूर -खानसोबत लग्न केलं. आज या दोघांना तैमूर आणि जहांगीर ही दोन मुलं आहेत. मात्र, तरीदेखील सैफच्या पहिल्या पत्नीची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत असते.4 / 10सैफने १९९१ मध्ये अमृता सिंगसोबत लव्ह मॅरेज केलं. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. लग्नाच्या १३ वर्षानंतर ही जोडी विभक्त झाली.5 / 10सैफ -अमृताचा घटस्फोट झाल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. या जोडीच्या घटस्फोटामागे अनेक कारणं असल्याचं म्हटलं जातं.6 / 10सैफने एका मुलाखतीत अमृताच्या वागण्यामुळे घटस्फोट घेतल्याचं सांगितलं होतं. परंतु, एका अभिनेत्रीमुळे या दोघांचा संसार उद्धवस्त झाल्याचं म्हटलं जातं. 7 / 10सैफ रोजा कॅटलानो या इटालियन मॉडेलच्या प्रेमात पडल्यामुळे त्याने अमृताची फसवणूक केल्याचं म्हटलं जातं.8 / 10रोजा आणि सैफची पहिली भेट २००४ मध्ये केनियामध्ये झाली होती. या काळात सैफ आणि अमृताच्या नात्यात अनेक चढउतार येत होते. त्यातच रोजा भेटल्यामुळे तो तिच्या प्रेमात पडला.9 / 10सैफ आणि रोजाच्या अफेअरची कुणकुण त्यावेळी अमृताला लागली होती. त्यामुळे सैफ करत असलेली फसवणूक तिला मान्य नव्हती. 10 / 10२००४ साली अमृता आणि सैफने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे सैफसाठी रोजा मुंबईत आली होती. मात्र, येथे आल्यावर सैफला पत्नी आणि दोन मुलं असल्याचं समजलं.