Join us

कोण-कोण आहे परिणीती चोप्राच्या सासरी?, असं आहे सासू-सासऱ्यांचं लाइफस्टाइल? जाणून घ्या राघव चड्ढा यांच्या कुटुंबाबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 13:23 IST

1 / 9
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या शाही लग्नाची सर्वत्र चर्चा आहे. दोघेही २४ सप्टेंबर रोजी उदयपूरमध्ये लग्न करणार आहेत. कार्यक्रमस्थळी पाहुण्यांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे.
2 / 9
परिणीती चोप्रा लवकरच राघव चड्ढा यांची होण्याआधी तिच्या सासरच्यांची ओळख करुन घेऊयात.
3 / 9
आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा हे पंजाबी कुटुंबातून आले आहेत. ते दिल्लीचे रहिवासी आहेत. त्यांच्या कुटुंबात राघव चड्ढा यांच्या आई-वडिलांशिवाय त्यांची धाकटी बहीणही आहे.
4 / 9
त्यांचे वडील सुनील चड्ढा हे व्यापारी आहेत, तर आई अलका गृहिणी आहेत. राघव यांचे आई-वडील दिल्लीतील राजेंद्र नगरमध्ये राहतात.
5 / 9
राघव यांची धाकटी बहीण व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहे.
6 / 9
राघव यांनी दिल्लीच्या मॉडर्न स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. ते अभ्यासात खूप हुशार होते आणि त्याला शाळेत वादविवाद स्पर्धेत सहभागी व्हायला आवडत असे. राघव चढ्ढा यांनी दिल्ली विद्यापीठातून महाविद्यालयीन शिक्षण घेतले आहे.
7 / 9
त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते परदेशात गेले. त्यांनी 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मधून EMBA कोर्स केला आहे. यासोबतच त्यांनी अनेक अकाउंटन्सी फर्ममध्येही काम केले आहे. राजकारणात येण्यापूर्वी राघव चढ्ढा हे चार्टर्ड अकाउंटंट होते.
8 / 9
राघव चढ्ढा यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, २०११ मध्ये सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' चळवळ सुरू झाली. त्यानंतरच ते शिक्षण पूर्ण करून भारतात परतले.
9 / 9
यादरम्यान राघव यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. तेव्हापासून ते राजकारणात रमले. २०१२ मध्ये आम जनता पार्टीची स्थापना झाली तेव्हा २४ वर्षांचे राघव टेलिव्हिजनवरील चर्चेत पक्षाच्या वतीने आपली बाजू मांडत होते.
टॅग्स :परिणीती चोप्रा