आर्यनसोबत कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर चर्चेत आली 'ही' पाकिस्तानी अभिनेत्री; पाहा ग्लॅमरस लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 13:55 IST
1 / 9पाकिस्तानी अभिनेत्री सादिया खान सध्या चांगलीच चर्चेत आहे. नव्या वर्षाचे तिने दुबईमध्ये आपल्या मित्रांसोबत केले, या पार्टीत शाहरुख खानचा मुला आयर्न खानही उपस्थित होता. आयर्नसोबतचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 2 / 9या फोटोत आर्यन खान आणि सादियासोबत पोझ देताना दिसली. आर्यन आणि सादियाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हापासून सादिया खान चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सादिया आर्यनची गर्लफ्रेंड असल्याचे बोलले जात आहे. 3 / 9सादिया खान पाकिस्तानी अभिनेत्री आहे. तिने अनेक टीव्ही मालिकामध्ये काम केले आहे. सादियाने खुदा आणि मोहब्बत, शायद, यारियां या शोमध्ये काम केले आहे. 4 / 9सादिया खान रिअल लाईफमध्ये ग्लॅमरस आहे. सादिया सोशल मीडियावर चर्चेत आहे. 5 / 9सादिया सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्रामवर १.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. ती नेहमी चाहत्यांना फोटो शेअर करुन अपडेट देत असते. 6 / 9सादिया खानने आतापर्यंत अनेक फोटो शेअर केले आहेत, या फोटोंवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 7 / 9सादिया तिच्या अभिनयानेही चर्चेत असते. सादिया फक्त पाकिस्तानमध्येच प्रसिद्ध नाही तर आता आर्यन खानसोबत दिसल्यामुळे भारतातही चर्चेत आली आहे. 8 / 9सादियाने काही दिवसापूर्वी आर्यन खानसोबतचे फोटो शेअर केले होते. 9 / 9सादिया नेहमी नव्या लूकमध्ये आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करते.