By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 17:19 IST
1 / 10‘ट्रायल बाय फायर’ या सीरिजची सध्या जोरदार चर्चा आहे. सीरिजमध्ये मराठमाेळी अभिनेत्री राजश्री देशपांडे हिने साकारलेल्या भूमिकेचंही जबरदस्त कौतुक होतेय. 2 / 10राजश्रीने या सीरिजसाठी प्रचंड मेहनत घेतली. अगदी आपल्या भूमिकेसाठी शारीरिक बदलही स्वीकारलेत. होय, या सीरिजचं शूटींग सुरू केलं तेव्हा तिचं वजन 50 किलो होतं. शूटींग संपलं तेव्हा हेच वजन 66 किलोंवर पोहाेचलं होतं. 3 / 10‘ट्रायल बाय फायर’ ही सीरिज उपहार अग्निकांडावर आधारित आहे. 13 जून, 1997 रोजी दुपारी 3 वाजता दिल्लीतील उपहार चित्रपटगृहात ‘बॉर्डर’ चित्रपटाचा शो सुरू असताना आग लागली होती. 4 / 10या आगीमुळे थिएटरमध्ये अडकून सुमारे 59 लोकांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला होता तर चेंगराचेंगरीमुळे 103 जण गंभीर जखमी झाले होते. देशाच्या इतिहासातील या अत्यंत अत्यंत भयावह आगीच्या घटनेवर ही वेब सीरिज बेतलेली आहे. 5 / 10या सीरिजमध्ये अभिनेता अभय देओल हा शेखर कृष्णमूर्ती यांची भूमिका साकारतोय. उपहार थिएटरमधील आगीच्या घटनेत शेखर कृष्णमूर्ती यांच्या दोन्ही मुलांचं निधन झालं होतं. 6 / 10सीरिजमध्ये अभिनेत्री राजश्री देशपांडे ही त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. तिने नीलमची भूमिका साकारली आहे. नीलम व शेखर जवळपास 20 वर्षांपेक्षा जास्त काळ न्यायासाठी लढतात. 7 / 10अलीकडे एका मुलाखतीत राजश्री नीलमच्या भूमिकेबद्दल बोलली. ती म्हणाली, राजश्री राहून मी नीलम साकारू शकत नव्हते. मला नीलमला शोधायचं होतं, तिच्यासारखं दिसायला, विचार करायला हवं होतं. 8 / 10पुढे ती म्हणाली, 20 वर्ष लढा देणाऱ्या नीलमची भूमिका माझ्या वाट्याला येणं यासाठी मी स्वत:ला नशीबवान मानते. मी या सीरिजचं शूटींग सुरू केलं तेव्हा माझं वजन 50 किलो होतं. शूटींग संपता संपता ते 66 किलो झालं होतं. 9 / 10तिने सांगितलं, मला वजन वाढवावं लागलं. कारण मला नीलम हे कॅरेक्टर वेगवेगळ्याप्रकारे दाखवायचं होतं. तिचा २० वर्षांचा प्रवास मला उभा करायचा होता. वय वाढतं तसे शारिरीक बदल होतात, ते मला दाखवायचं होतं.10 / 10 माझ्याकडे वजन वाढवायला फार कमी वेळ होता. त्यामुळे या काळात मी अनहेल्दी प्रकारानं वजन वाढवलं. खरं तर हे योग्य नव्हतं. पण काय करणार. काम मिळालं तर ते हातचं जायला नको. अचानक मला काढून टाकलं तर त्यामुळे स्वत:ला इतकं तयार करायचं की, दिग्दर्शकानेही हीच माझी नीलम असं म्हणायला हवं. मी अशाच पद्धतीने काम करते, असं ती म्हणाली.