By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 14:14 IST
1 / 8पंचायत फेम तृप्ती साहूने टीव्ही इंडस्ट्रीबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. टीव्ही स्टार्स आणि गोरेपणाबाबत भाष्य केलं आहे. 2 / 8डिजिटल कमेंट्रीशी झालेल्या संभाषणात जेव्हा तृप्तीला विचारलं गेलं की, आजकाल लोक अचानक गोरे दिसू लागलेत तर यामागे काय कारण आहे? तुला कधी असं काही म्हटलं गेलं आहे का?3 / 8तृप्ती म्हणाली, 'अनेकांनी मला या गोष्टींची शिफारस केली. २०१८ मध्ये माझ्या ओळखीची एक व्यक्ती होती, तिने मला सांगितलं की, हे इंजेक्शन माझ्याकडून घे, मी ते २५ हजारांना देत आहे, तू गोरी होशील.'4 / 8'मी म्हणाले की, का व्हायचं गोरं? मला ते नको आहे. त्यावर ती म्हणाली अरे, लोखंडवालातील सर्व मुली हे इंजेक्शन घेऊन बसल्या आहेत. पण मी नाही म्हणाले कारण मला ते नको आहे.'5 / 8'मालिकांमध्ये काम केलं आहे. तर तिथे एका सह-अभिनेत्रीनेही मला सांगितलं की, एका डॉक्टरने तिला गोरं होण्यासाठी औषध दिलं आहे.'6 / 8'टीव्ही इंडस्ट्रीमध्येही लोकांची अशी मानसिकता आहे की, जर तुम्ही गोरे झालात तर तुम्हाला काम मिळेल. म्हणून जे लोक गोरं होण्यासाठी ट्रीटमेंट घेतात.'7 / 8'लोक त्यांच्या त्वचेचा रंग बदलतील, नाकाचा आकार बदलतील,पण जोपर्यंत तुम्ही हे स्वीकारत नाही तोपर्यंत इनसिक्योरिटी जाणार नाही' असं तृप्ती साहूने म्हटलं आहे. 8 / 8पंचायतमुळे आता तृप्तीची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. ती सोशल मीडियावर एक्टिव्ह असून सुंदर फोटो शेअर करत असते. तिचे असंख्य चाहते आहेत.