Join us

'या' सीरिजनं जिंकलेत तब्बल ६६ पुरस्कार, IMDb रेटिंग आहे ९, तुम्ही पाहिली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 16:14 IST

1 / 10
काही अशा सीरिज आहेत, ज्यांनी इतिहास रचलाय. अशाच एका धमाकेदार सीरिजनं केवळ प्रेक्षकांच्या मनात आपली अढळ जागा निर्माण केली आणि ६६ पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं.
2 / 10
विशेष म्हणजे या सीरिजला IMDb वर अविश्वसनीय असं ९ रेटिंग आहे. जगभरातील लाखो प्रेक्षक आणि समीक्षकांच्या मतांवर आधारित हे रेटिंग दिलं जातं. म्हणजे हे रेटिंग सीरिजच्या कथानकाची आणि अभिनयाच्या ताकद दर्शवतो.
3 / 10
२०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या या सीरिजचे आतापर्यंत चार सीझन आले आहेत. प्रत्येक सीझनला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले आहे. सध्या प्रेक्षक पाचव्या सीझनची वाट पाहात आहेत.
4 / 10
तर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी हिंदी कॉमेडी सीरिज आहे 'पंचायत' (Panchayat). Amazon Prime Video वरील या लोकप्रिय सीरिजने आतापर्यंत तब्बल ६६ पुरस्कार जिंकून इतिहास रचलाय.
5 / 10
या सीरिजचा पहिला सीझन हा २०२० मध्ये प्रदर्शित झाला. ज्यात ग्रामीण भारतातील साधेपणा तसेच व्यंग्य हलक्याफुलक्या पद्धतीने मांडले. जे प्रेक्षकांना प्रचंड आवडलं. यानंतर दुसरा सीझन हा २०२२ मध्ये प्रदर्शित झाला. 'पंचायत'च्या दुसऱ्या सीझनमध्ये अभिषेक त्रिपाठी या शहरातल्या तरुणाच्या फुलेरा गावातील ग्रामसचिव म्हणून नोकरीचा अनुभव, त्याला गावातील संस्कृती आणि राजकारणाशी जुळवून घेताना येणाऱ्या अडचणी दाखवण्यात आल्या आहेत.
6 / 10
तर 'पंचायत' सीरिजचा तिसरा सीझन हा २०२४ मध्ये आला. ज्यामध्ये फुलेरा गावातील राजकारण आणि सचिव अभिषेकच्या प्रेमकथेची झलक पाहायला मिळते. तीन सीझन हिट ठरल्यानंतर यंदा या सीरिजचा चौथा सीझन जून २०२५ मध्ये प्रदर्शित झाला. सीरिजच्या चारही सीझनमध्ये प्रत्येकी ८ एपिसोड्स आहेत, म्हणजेच असे एकूण ३२ एपिसोड आहेत.
7 / 10
पुरस्कारांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, 'पंचायत'ने ४ IIFA पुरस्कार, ११ इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार आणि ९ फिल्मफेअर पुरस्कार अशा एकूण ६६ पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. साधेपणा आणि शक्तिशाली कथाकथनाच्या जोरावर 'पंचायत'ने भारतीय वेब सिरीजचे मानक नवीन उंचीवर नेले आहेत.
8 / 10
'पंचायत'ची लोकप्रियता केवळ पुरस्कारांमध्येच नाही, तर त्याच्या IMDb रेटिंगमध्येही दिसून येते. या सिरीजला १० पैकी ९ असे मोठे रेटिंग मिळालेले आहे.
9 / 10
या सीरिजमध्ये जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, नीना गुप्ता, फैसल मलिक, चंदन रॉय, सान्विका, दुर्गेश कुमार, पंकज झा आणि आसिफ खान मुख्य भूमिकेत आहेत. ही धमाकेदार सीरिज चंदन कुमार आणि दीपक कुमार मिश्रा यांनी तयार केली आहे.
10 / 10
कोणतेही मोठे सेट्स, लोकेशन्स, डिझायनर कपडे नाही तर दररोजच्या जीवनातले, आपल्या मातीतले विषय हाताळले तरी तो आशय अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो, हे पंचायत सीरिजनं दाखवून दिलं आहे. जर अद्याप ही सीरिज तुम्ही पाहिली नसेल, तर लगेच पाहून टाका.
टॅग्स :वेबसीरिजनीना गुप्ता