Join us

'दुपहिया' या गाजत असलेल्या वेब सीरिजमधली 'रोशनी' आहे तरी कोण? काजोलसोबतही केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 16:14 IST

1 / 8
सध्या ओटीटीवर गाजत असलेली वेबसीरिज 'दुपहिया' अगदी हलक्या फुलक्या कहाणीव आधारित आहे. क्राईम फ्री असलेल्या धडकपूर गावातून दुचाकी चोरीला जाते. शेवटी त्याचा कास पत्ता लागतो यावर अख्खी वेब सीरिज आहे.
2 / 8
यामध्ये गजराज राव यांच्या अभिनयाने सर्वांनाच प्रभावित केलं आहे. त्यांच्या मुलाच्या भूमिकेत 'लापता लेडीज'मधला स्पर्श दिसला. तर त्यांच्या लेक रोशनीचं पात्र अभिनेत्री शिवानी रघुवंशीने (Shivani Raghuvanshi) साकारलं आहे.
3 / 8
गजराज राव यांनी रोशनीच्याच लग्नाचा घाट घातलेला असतो. तिच्याच लग्नात हुंडा म्हणून ही दुचाकी असते जी चोरीला जाते. अभिनेत्री शिवानीने ही भूमिका अतिशय उत्तम साकारली आहे. शिवानी नक्की कोण आहे आणि तिने याआधी काय काय काम केलं आहे वाचा.
4 / 8
शिवानी दिल्लीची आहे. १९९१ साली तिचा जन्म झाला. दिल्लीतच तिने शिक्षण घेतलं. तिला १२ वीत असताना डॉक्टर बनण्याची इच्छा होती. २००२ साली ९वीत असताना जेव्हा ती 'देवदास' बघायला गेली तेव्हाच तिने फिल्म इंडस्ट्रीत यायचं ठरवलं.
5 / 8
एक दिवस कॉलेजमधून घरी येताना मेट्रोमध्ये तिची भेट कास्टिंग कोऑर्डिनेटरशी झाली. त्याने शिवानीला एका जाहिरातीत काम दिलं. यानंतर ती अनेक जाहिरातींमध्ये दिसली.
6 / 8
२०१४ साली तिने 'तितली' सिनेमातून पदार्पण केलं. याशिवाय ती 'मेड इन हेवन' या गाजलेल्या सीरिजमध्ये दिसली. अभिनयाचं शिक्षण न घेताही तिने उत्तम कामं केली.
7 / 8
सुरुवातीला शिवानीने अभिनय करिअर गांभीर्याने घेतलं नव्हतं. तिचा हा दृष्टिकोन पाहून एका दिग्दर्शकाने तिला इशारा दिला. असाच अॅटिट्यूड असेल तर काम मिळणार नाही असं तो तिला म्हणाला.
8 / 8
यानंतर शिवानीने 'रात अकेली है', 'देवी', 'बाते', 'अंग्रेजी मे कहते', 'पोशम पा' यांसारख्या सिनेमांमध्येही काम केलं. 'देवी' मध्ये ती काजोलसोबत दिसली.
टॅग्स :वेबसीरिजसेलिब्रिटी