Join us  

Vicky Kaushal: विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 4:13 PM

1 / 8
बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने आतापर्यंत एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर निर्माण केले आहे.
2 / 8
आता पुन्हा एकदा विकी कौशल अशाच दमदार भूमिकेत दिसणार आहे. आर्मी ऑफिसरच्या भूमिकेनंतर विकी कौशल आता ऐतिहासिक चित्रपटात दिसणार असून नुकतीच त्याची घोषणा झाली आहे.
3 / 8
अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
4 / 8
छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे.
5 / 8
लक्ष्मण उतेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती अभिनेत्याने दिलेली नाही.
6 / 8
या सिनेमासह, विकी कौशलची ही सहावी भूमिका असेल जी सत्य जीवनावर आधारित असेल. त्याने याआधी राझी, संजू, उरी: द सर्जिकल स्ट्राइक, सरदार उधम आणि आगामी प्रकल्प सामबहादूरमध्ये वास्तविक जीवनातील भूमिका साकारल्या होत्या.
7 / 8
विकी कौशल सध्या त्याच्या आगामी ‘सॅम बहाद्दर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.
8 / 8
या चित्रपटात तो लष्करी अधिकारी ‘सॅम बहाद्दर’ यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
टॅग्स :विकी कौशल