Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shiv Thakare : 8 वर्षांचं नातं, 11 रुपये दानपेटीत टाकून माझ्यासाठी नवस बोलायची; शिव ठाकरेला आठवली 'ती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 18:38 IST

1 / 10
शिव ठाकरे हे नाव रिएलिटी शोमधून खूपच लोकप्रिय झालं आहे. तो रोडीजमध्ये दिसला होता. यानंतर त्याने बिग बॉस मराठीचं विजेतेपद पटकावलं. बिग बॉस ओटीटी आणि बिग बॉस 16 मध्येही त्याने आपल्या स्ट्राँग पर्सनॅलिटीने सर्वांना इम्प्रेस केलं.
2 / 10
शिव आता 'झलक दिखला जा' मध्ये आपल्या डान्सने सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. याच दरम्यान तो अनेकदा त्याच्या पर्सनल लाईफमधील विविध गोष्टींवर बोलत असतो. व्हॅलेंटाईन वीकमध्ये त्याने आता व्हॅलेंटाईन डे आणि त्याच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल सांगितलं आहे.
3 / 10
आजही शिवला त्याच्या एक्स गर्लफ्रेंडची आठवण येत आहे. मात्र त्याचा आता तिच्यासोबत कोणताच कॉन्टॅक्ट नाही. 'मी कॉलेजमध्ये असताना आठ वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो. व्हॅलेंटाईन डेची तयारी मी महिनाभर आधीच सुरू करायचो.'
4 / 10
'मी सेकंडहॅण्ड कार सजवायचो आणि ती खूप खूश व्हायची. त्या एका दिवसासाठी ती माझी राणी असायची आणि मी तिचा राजा. इंजिनिअरिंगनंतर मला माहीत होतं की यात माझं भविष्य नाही, म्हणून मी संघर्ष करू लागलो.'
5 / 10
'मला त्यावेळी फार काही माहीत नव्हतं आणि तिला लग्न करायचं होतं म्हणून आमचं ब्रेकअप झालं. यानंतर मला एकामागून एक रिॲलिटी शो येऊ लागले. एक दिवस मला एक ईमेल आला.'
6 / 10
'ईमेलमध्ये लिहिलं होतं की, मला आशा आहे की तुला जे हवं होतं ते तुला मिळालं आहे. देवाची नेहमीच तुझ्यावर अशी कृपा राहो. ते 11 रुपये आठवतात. खरं तर आमच्या इथे एका देवीचं मंदिर होतं.'
7 / 10
'तिथे ती 11 रुपये देऊन माझी स्वप्नं पूर्ण व्हावीत यासाठी नवस बोलायची. पण आता ती कुठे आहे हे मला माहीत नाही. ती सोशल मीडियावर नाही आणि माझ्याकडे तिचा नंबरही नाही. माझा व्हॅलेंटाईन डे तेव्हा असा असायचा.'
8 / 10
'मला तिला सांगायचं आहे की, ती अजूनही माझी व्हॅलेंटाईन आहे. तुझे ते 11 रुपये काम करत आहेत आणि मला चांगलं काम मिळत आहे. म्हणूनच व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा' असं शिव ठाकरेने म्हटलं आहे.
9 / 10
10 / 10
टॅग्स :शीव ठाकरे