Urvashi Rautela : 'डाकू महाराज'मध्ये उर्वशीची ३ मिनिटांची भूमिका, मिळाली ३ कोटी फी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 12:34 IST
1 / 8अभिनेत्री उर्वशी रौतेला 'डाकू महाराज' या चित्रपटामुळे चर्चेत असते. पण यासाठी तिने नक्की किती फी आकारली याबाबत आता विविध गोष्टी बोलल्या जात आहेत. 2 / 8या चित्रपटात अभिनेत्रीची ३ मिनिटांची भूमिका होती. असं असूनही तिची फी जास्त असल्याचं सांगितलं जातं. चित्रपटातील मुख्य कलाकार नंदमुरी बालकृष्ण आहेत.3 / 8ईटी नाऊच्या रिपोर्टनुसार, उर्वशीने डाकू महाराज या चित्रपटातील तिच्या काही मिनिटांच्या भूमिकेसाठी ३ कोटी रुपये घेतले आहेत.4 / 8यापूर्वीचे अनेक चित्रपट लोकप्रिय झाले नसले तरी डाकू महाराजमधील तिने अभिनयाच्या प्रत्येक मिनिटासाठी १ कोटी रुपये मागितल्याचं म्हटलं जातं.5 / 8या अभिनेत्रीची एकूण संपत्ती २३६ कोटी रुपये असल्याचं सांगितले जातं. तिचे इन्स्टाग्रामवर ७३ मिलियन फॉलोअर्स आहेत. आजकाल ती तिच्या विधानांमुळे चर्चेत आहे.6 / 8डाकू महाराजच्या ओटीटी रिलीजमधून तिने सीन्स हटवण्यात आल्याची चर्चा आहे. ती पोस्टरमधूनही गायब होती.7 / 8सूत्रांचं म्हणणे आहे की उर्वशी ओटीटी रिलीजचा एक भाग आहे. प्रसिद्धीसाठी तिने तिचे सीन काढून टाकल्याची बातमी पसरवली.8 / 8