Join us
Daily Top 2Weekly Top 5

ओ भाई, इस गरीब को कोई कपडे दे दो...! उर्वशी रौतेलाच्या ‘फाटक्या’ पॅन्टची लोकांनी घेतली मजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 14:20 IST

1 / 10
‘हेट स्टोरी4’मध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना रिझवणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला चित्रपटांत फार कमाल दाखवू शकली नाही. पण याऊपर चर्चेत कसे राहायचे हे उर्वशीला चांगलेच कळते. सोशल मीडियावर ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. आपल्या बोल्ड अदांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या वेगळाच कारणाने चर्चेत आहे.
2 / 10
होय, उर्वशीला सध्या सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल केले जातेय. कारण काय तर तिचे कपडे.तर उर्वशीने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर स्वत:चे काही स्टायलिश फोटो शेअर केलेत. यात ती हेलिकॉप्टरसमोर उभी राहून पोज देतेय.
3 / 10
या फोटोत उर्वशी रिप्ड जीन्स आणि सोबत ब्लॅक कलरच्या ब्रालेट टॉपमध्ये दिसतेय. काही चाहत्यांना उर्वशीचा हा अवतार चांगलाच भावला. पण काहींनी हे फोटो पाहताच उर्वशीची खिल्ली उडवणे सुरु केले.
4 / 10
खूप गरीब आहे बिचारी, पँटही फाटलीये, असे लिहित एका युजरने उर्वशीची मजा घेतली. अन्य एकाने ‘इतकी गरिबी याआधी कधीच पाहिली नाही,’ असे लिहित उर्वशीच्या रिप्ड जीन्सची खिल्ली उडवली. माझी पँट घेऊन जा, अशी ऑफरही अनेकांनी तिला दिली.
5 / 10
रिप्ड जीन्समुळे ट्रोल होणारी उर्वशी अर्थातच पहिली अभिनेत्री नाही. याआधी सारा अली खानही अशीच ट्रोल झाली होती. अगदी लोकांनी तिला भिकारीही म्हटले होते.
6 / 10
मलायका अरोराही अनेक वर्षांपूर्वी अशीच ट्रोल झाली होती. तिचे हे फोटो आणि तिचा हा अवतार आजही चाहते विसरू शकलेले नाहीत.
7 / 10
एलिगेंट अनुष्का शर्माही अशाच कपड्यांमुळे ट्रोल झालीये. अनुष्काला रिप्ड जीन्स खूप आवडते. पण या रिप्ड जीन्स लव्हमुळे तिला ट्रोल व्हावे लागले होते.
8 / 10
क्रिती खरबंदा हिनेही एकदा रिप्ड जीन्समधील फोटो शेअर केलेत आणि ती ट्रोल झाली होती.
9 / 10
आलिया भट ही सुद्धा या रांगेत आहे.
10 / 10
अभिनेत्री निधी अग्रवाल हिलाही याच कारणाने ट्रोल केले गेलेय.
टॅग्स :उर्वशी रौतेला