Join us

तुझ्यात जीव रंगला ! अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीच्या साखरपुड्यातील काही खास क्षण, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 21:12 IST

1 / 9
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' (Tuzyat Jeev Rangala) मालिकेतील राणादा आणि अंजली बाईंची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली होती. मालिकेत राणादाची भूमिका अभिनेता हार्दिक जोशी(Hardik Joshi)ने साकारली होती तर अंजली पाठकची भूमिका अभिनेत्री अक्षया देवधर(Akshaya Deodhar)ने निभावली होती.
2 / 9
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरचा नुकताच साखरपुडा पार पडला.
3 / 9
या साखरपुड्याचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
4 / 9
अभिनेत्री अक्षया देवधर हिने इंस्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, फायनली एंगेज.
5 / 9
या फोटोवर फक्त सेलिब्रेटीच नाही तर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
6 / 9
अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा रंगली होती. मात्र याबद्दल त्या दोघांनी कधी सांगितले नव्हते. मात्र आता या दोघांनी साखरपुड्याचे फोटो शेअर करून चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे.
7 / 9
साखरपुड्याच्या फोटोंशिवाय हार्दिक जोशीने एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
8 / 9
या व्हिडीओत हार्दिक जोशी गुडघ्यावर बसून अक्षयाला रिंग घालताना दिसतो आहे.
9 / 9
तसेच अक्षयादेखील या व्हिडीओत हार्दिकला रिंग घालताना दिसते आहे.
टॅग्स :तुझ्यात जीव रंगलाअक्षया देवधरहार्दिक जोशी