Join us

"मला माझं स्वातंत्र्य..."; बिझनेसमनच्या प्रेमात वेडी झाली तृप्ती डिमरी?; नात्याबद्दल सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 15:35 IST

1 / 10
अभिनेत्री तृप्ती डिमरी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. अभिनेत्री बिझनेसमन सॅम मर्चंटला डेट करत आहे.
2 / 10
ख्रिसमस आणि न्यू ईयरच्या निमित्ताने दोघेही एकत्र सुट्टीवर गेले होते. सोशल मीडियावर अनेक फोटो समोर आले जे याचा पुरावा होते.
3 / 10
आता तृप्तीने सॅमसोबतच्या तिच्या नात्याबद्दल मौन सोडलं आहे. ई-टाईम्सशी बोलताना तृप्ती म्हणाली की, कधीकधी तुमच्या आयुष्यातील अटेंशन तुम्हाला खूप त्रास देतं.
4 / 10
'मी एक सेलिब्रिटी आहे, लोक माझ्या लाईफबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात. मला माझं स्वातंत्र्य खूप आवडतं.'
5 / 10
'मला ते दिवस आठवतात जेव्हा मी रस्त्यावर कोणताही संकोच न करता आणि कोणतीही काळजी न करता फिरायचे.'
6 / 10
'बऱ्याचदा मी सोशल मीडियापासून दूर राहते. मी काहीही पोस्ट करत नाही. जेव्हा मला वाटतं की हो, मी पोस्ट करायला हवे तेव्हाच मी ते करते.'
7 / 10
'माझी टीमही मला सांगते की मी हे करू नये. पण समाज माझ्याकडून काय अपेक्षा करतो याचा विचार न करता मी स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक राहू इच्छिते.'
8 / 10
'माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मी जे काही पोस्ट करते ती माझी इच्छा आहे.'
9 / 10
'मी फक्त फुलांचा फोटो शेअर करेन किंवा माझ्या वैयक्तिक आयुष्यातील क्षण शेअर करेन, मला फक्त स्वतःला आनंदी ठेवायचं आहे' असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.
10 / 10
टॅग्स :तृप्ती डिमरीबॉलिवूड