Join us
Daily Top 2Weekly Top 5

शूssss.... रोमान्स खराब मत करना! ‘उतरन’ फेम टीना दत्ताने ‘बिग बॉस’ला लिहिले प्रेमपत्र

By रूपाली मुधोळकर | Updated: September 24, 2020 18:00 IST

1 / 10
होय, ‘उतरन’ फेम टीना दत्ताने ‘बिग बॉस’ला चक्क लव्ह लेटर लिहिले आहे.
2 / 10
टीनाने ‘बिग बॉस’ लिहिलेले हे लव्ह लेटर वाचून तुम्हीही हैराण व्हाल.
3 / 10
तर ‘बिग बॉस’चे 14 वे सीझन लवकरच सुरु होत आहे. अशात बिग बॉसच्या घरात कोण कोण जाणार, याबद्दलची उत्सुकता ताणली गेली आहे. यात एक नाव टीना दत्ता हिचेही आहे.
4 / 10
टीना ‘बिग बॉस’च्या घरात जाणार, अशी चर्चा जोरात आहेत. आता या चर्चेत किती तथ्य आहे, हे तर तुम्हाला टीनाचे लव्ह लेटर वाचल्यानंतरच कळणार.
5 / 10
डिअर बिग बॉस, मी तुझ्यावर किती प्रेम करते, याची तुला कल्पना आहे? अशा शब्दांत तिने या लव्हलेटरची सुरुवात केली आहे.
6 / 10
पुढे ती लिहिते, मी कोणाला काहीही सांगितलेले नाही. अरे देवा, जेव्हापासून माझे तुझ्यासोबतचे काल्पनिक नाते सुरु झाले, तेव्हापासून माझ्या फोनची रिंग सारखी वाजत आहे. (तू खरच बिग बॉसमध्ये जाणार का? अशी विचारणा टीनाला सतत होत आहे.)
7 / 10
पुढे ती लिहिते, आपले दोघांचे नाव कसे जोडले, असा विचार मला पडलाय. सगळे ध्यानात घ्या, नाती स्वर्गात बनत नाहीत. अनेकदा टीव्हीच्या दुनियेतील लोक तुमची तुमच्या जोडीदाराशी भेट घालून देतात.
8 / 10
बिग बॉस मी तुमच्यावर खूप प्रेम करते. पण मी केवळ तुमची प्रेक्षक आहे;स्पर्धक नाही, लव्ह टीना दत्ता, अशी तिने या पत्राची अखेर केली आहे.
9 / 10
एकंदर काय तर आपण बिग बॉसमध्ये जाणार नसल्याचे तिने या लव्हलेटरमधून स्पष्ट केले आहे.
10 / 10
टीनाचे बिग बॉसला लिहिलेले हे पत्र सध्या तुफान व्हायरल होतेय. अर्थात टीना बिग बॉसमध्ये जाणार नाही, हे ऐकल्यानंतर तिच्या काही चाहत्यांची निराशाही झाली आहे. उतरन या मालिकेने टीना दत्ताला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. यानंतर डायन आणि खतरों के खिलाडी या शोमध्ये ती दिसली होती.
टॅग्स :टिना दत्ताबिग बॉस