नशीबाने थट्टा कशी माडंली ! जेव्हा हनीमुनच्या रात्री पतीनेच केला होता 'या' अभिनेत्रीचा सौदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 14:38 IST
1 / 10अभिषेकच्या आयुष्यात आलेली पहिली तरुणी ही करिश्मा कपूर होती. करिश्मा-अभिषेक बालपणापासून एकमेकांना ओळखत होते. 2 / 10अभिषेकला 'रेफ्यूजी' हा पहिला सिनेमा मिळाला. या सिनेमात त्याच्या अपोझिट करिश्माची धाकटी बहीण करीना कपूर होती. 3 / 10असे म्हटले जाते, की करीना सेटवर अभिषेकला भावोजी म्हणून हाक मारायची. करिश्मा नेहमी अभिषेकला भेटायला सेटवर यायची. अभिषेकचा पहिला सिनेमा फ्लॉप ठरला, मात्र दोघांचे प्रेम फुलतच गेले.4 / 10अमिताभ यांनी त्यांच्या 60 व्या वाढदिवशी अभिषेक-करिश्माच्या साखरपुड्याची घोषणा केली होती. त्यावेळी सर्वांना अभिषेक-करिश्माच्या प्रेमाविषयी समजले. 5 / 10अभिषेकसोबत लग्नानंतर करिश्माने सिनेसृष्टीत काम करु नये, अशी जया बच्चन यांनी तिला अट घातल्याचे वृत्त लगेचच आले. ही अट करिश्माची आई बबिता यांना मात्र मान्य नव्हती.6 / 10बबिता यांना जावाई म्हणून अभिषेक पसंत नव्हता. त्याकाळी अभिषेकचे अनेक सिनेमे फ्लॉप होत होते. तर करिश्मा आघाडीची अभिनेत्री होती.7 / 10बबीता यांना भिती वाटायची, की अभिषेक कधीच यशस्वी अभिनेता होऊ शकला नाही तर... अखेर करिश्मा आई पुढे झुकली आणि तिने स्वत: हे नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला.8 / 102003 मध्ये या करिश्माचं लग्न बिझनेसमन संजय कपूरशी मोठ्या थाटामाटात झालं. मात्र लग्नाच्या अवघ्या 7 वर्षांतच या दोघांचा घटस्फोट झाला. 2010 ला करिश्मा आपल्या मुलांना घेऊन माहेरी निघून आली.9 / 10 करिश्मानं संजयच्या कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी उघड केल्या तसेच तिला मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला. करिश्मानं त्याच्यावर हनीमूनच्या रात्रीच त्यानं माझा सौदा केला होता असा आरोप केला होता.10 / 10इतकेच नाही तर संजयनं त्याच्या भावाला करिश्मावर लक्ष ठेवायला सांगितल्याचे तिने सांगितले होते.