Join us
Daily Top 2Weekly Top 5

या नवविवाहित मराठी सेलिब्रेटी जोडप्यांनी साजरी केली पारंपरिक संक्रांत, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 17:30 IST

1 / 9
छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा गेल्या काही महिन्यांत अनेक जोड्या लग्नाच्या बेडीत अडकल्या आहेत. नुकतेच लग्न झालेले असे अनेक मराठी कलाकार आहेत ज्यांनी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र मकर संक्रांतीचा सण साजरा केला.
2 / 9
गेल्या वर्षी ३ मे रोजी अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता विराजस कुलकर्णी हे कपल लग्नबंधनात अडकली. नुकतंच शिवानी रांगोळेने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या लग्ना नंतरच्या पहिल्या मकर संक्रांतीचे फोटो शेअर केले आहेत.
3 / 9
यामध्ये शिवानी आणि विराजस फारच गोड दिसत आहेत. शिवानीने काळ्या रंगाची पारंपरिक साडी नसेल आहे तर विराजसने काळा कुर्ता परिधान केला आहे. सोबतच या दोघांनी आवर्जून हलव्याचे दागिनेही परिधान केले आहेत.
4 / 9
अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी ही जोडी नुकतीच लग्नबंधनात अडकली. हार्दिक आणि अक्षया यांनीही नुकतीच त्यांची पहिली मकर संक्रात साजरी केला.
5 / 9
अक्षया रंगाच्या साडीत तर हार्दिक काळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये खूपच सुंदर दिसत होते. सोशल मीडियार फोटो शेअर करत या दोघांनीही चाहत्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्यात. तसेच अक्षया आणि हार्दिकने त्यांची पहिली मकरसंक्रांत होम मिनिस्टरमध्येही साजरी केली.
6 / 9
गायक रोहत राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर हे गेल्या वर्षी लग्नबंधनात अडकले. यंदाच्या वर्षी या दोघांनीही त्यांची पहिली मकरसंक्रांत साजरी केलीये.
7 / 9
जुईने काळ्या रंगाची साडी तर रोहिने काळ्या रंगाचा कुर्ता परिधान करून त्यावर हलव्याचे दागिनेही परिधान केले होते. याचे फोटो दोघांनीही त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेत.
8 / 9
फुलाला सुगंध मातीचा मालिकेतून घराघरात पोहचली अभिनेत्री मधुरा जोशीने देखील पतीसोबत तिची पहिली मकरसंक्रात साजरी केली.
9 / 9
काळ्या रंगाची साडी आणि पतीने काळ्याची कुर्ता परिधान करून मधुराने खास फोटोज सोशल मीडियावर शेअर केलेत. या फोटोंमध्ये दोघही कपल गोल्स देताना दिसतायेत. याशिवाय मधुराने मकर संक्रांतीनिमित्त खास फोटोशूट ही केलंय.
टॅग्स :अक्षया देवधरहार्दिक जोशीरोहित राऊतशिवानी रांगोळेविराजस कुलकर्णीमकर संक्रांती