माधुरी दीक्षितला 'आय लव्ह यू' म्हणाला अन् संसार मोडला; कोण आहे तो अभिनेता?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 13:36 IST
1 / 9माधुरी दीक्षित बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने नव्वदच्या दशकात आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलंय.2 / 9माधुरी दीक्षितने वयाची पन्नाशी उलटली असली तरी आजही तिच्या सौंदर्याची चर्चा होताना दिसते.3 / 9माधुरी दीक्षितचे अनेक किस्से आपल्याला ऐकायला मिळतात. त्यातील एक किस्सा म्हणजे तिच्यामुळे एका अभिनेत्याचे वैवाहिक जीवन बरबाद झालं होतं. कोण आहे हा अभिनेता ?4 / 9तर हा अभिनेता म्हणजे संजय दत्त. माधुरी आणि संजय दत्त यांचे एकेकाळी अफेयर होते.5 / 9संजय दत्त आणि माधुरी दीक्षितने बऱ्याच सिनेमात काम केले होते आणि रुपेरी पडद्यावरील त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली होती.6 / 9१९९१ साली रिलीज झालेल्या साजन सिनेमाच्या शूटिंगवेळी त्या दोघांमधील जवळीक वाढत गेली. संजय दत्तचे माधुरीवर खूप प्रेम होते. संजय दत्तने माधुरी दीक्षितकडे आपले प्रेम व्यक्त केले होते. त्याने तिला आय लव्ह यू म्हटले होते.7 / 9त्या दोघांच्या अफेयरची चर्चा खूप झाली होती. हे समजल्यावर संजय दत्तची पहिली पत्नी ऋचा शर्माला खूप वाईट वाटले होते.8 / 9अफेयरमुळे जेव्हा त्यांच्यातील मतभेद वाढू लागले तेव्हा संजय दत्त आणि ऋचा शर्माने घटस्फोट घेतला.9 / 9१९९३ साली मुंबई बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात संजय दत्तचं नाव समोर आल्यानंतर माधुरी दीक्षितने त्याच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली.