1 / 8भारतीय चित्रपटसृष्टीत सक्रीय राहिलेल्या एकेकाळच्या कलाकार ते भारतीय राजकारणात नेता म्हणून यशस्वी ठरलेल्या अनेक अभिनेत्री सध्या चर्चेत आल्या आहेत. राजकारणात उतरलेल्या काही अभिनेत्री अनेकदा वादविवादात अडकल्या आहेत. कधी स्वतःहून केलेल्या विधानामुळे तर कधी इतरांनी त्यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे या अभिनेत्री चर्चेत राहिल्या होत्या. पाहूया असा प्रवास करणाऱ्या कोण आहेत या अभिनेत्री?2 / 8ड्रीमगर्ल हेमा मालिनी भारतीय जनता पक्षाचा लोकप्रिय चेहरा आहे. २००३ मध्ये त्या राज्यसभा खासदार म्हणून नियुक्त केल्या गेल्या होत्या. १३ वर्षांपासून त्या राजकारणात आहेत आणि सध्या मथुरा लोकसभेच्या खासदार आहेत. विरोधी नेता गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या शहराची तुलना हेमा मालिनी यांच्या गालाशी केल्याने वाद निर्माण झाला होता.3 / 8आतापर्यंतच्या सर्वाधिक यशस्वी अभिनेत्री राजकारणी म्हणून जयललिता यांचे नाव घेतले जाते. जयललिता अनेकदा वादविवादात अडकल्या होत्या. संसदेत कधी-कधी त्यांना वाईट वागणुकीला सामोरे जावे लागले. कधी हत्या करण्याचा प्रयत्न, तर कधी कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यामध्ये त्यांचे नाव आले होते.4 / 8१९९४ मध्ये एकेकाळची लोकप्रिय अभिनेत्री जया प्रदा राजकारणात आल्या. १९९४ मध्ये त्यांनी तेलगू देसम पक्षात प्रवेश केला होता. २००४ मध्ये त्यांनी समाजवादी पक्ष जॉइन केला. २०१० मध्ये त्यांची या पक्षातून हकालपट्टी झाली. २०१९ मध्ये जया यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी जया यांच्याविषयी आपत्तीजनक विधान केले होते. त्यावरून त्या दोघांमध्ये वाद-विवाद सुरू होता.5 / 8कित्येक ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या अभिनेत्री जया बच्चन आज भारतीय राजकारणातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. २००४ पासून सातत्याने राज्यसभा खासदार असलेल्या जया बच्चन समाजवादी पार्टीच्या नेत्या आहेत. जया बच्चन नेहमी संसदेत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. 6 / 8सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूनंतर बॉलीवूडवर टीका करणाऱ्यांवर त्यांनी संसदेत आवाज उठवला होता. बंगाली अभिनेत्री नुसरत जहाॅं खासदार बनल्यापासून कामापेक्षा वादामुळेच चर्चेत असतात. लग्न आणि मुलावरून नुसरत अनेकदा वादात अडकल्या आहेत. त्यांनी परदेशात लग्न केले आणि एका वर्षातच भारतात ते नाकारले. पतीपासून विभक्त झाल्यानंतर नुसरत, बॉयफ्रेंड यश दासगुप्ताच्या मुलाची आई बनली आहे.7 / 8२०१९ मध्ये ‘रंगीला’ गर्ल ऊर्मिला मातोंडकरने लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांनी दक्षिण मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली मात्र, भाजप खासदार गोपाल शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे काहीच महिन्यांत त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला.8 / 8लोकप्रिय अभिनेत्री नगमा राजकारणात पाऊल टाकताच अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सेक्रेटरी बनल्या. २०१४ मध्ये सभेच्या वेळी गर्दीत एका व्यक्तीने नगमासोबत वाईट वर्तणूक केली. नगमा यांनी त्या व्यक्तीला जोरदार थप्पड लगावली होती. नगमा यांना फुलपूर सीटसाठी तिकीट मिळताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांना आपल्या रक्ताने पत्र लिहून त्यांना विरोध केला होता.