Shocking! करिअरच्या सुरूवातीला या बॉलिवूड स्टार्सनी ‘हे देखील’ सहन केलं...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 08:00 IST
1 / 9महानायक अमिताभ बच्चन यांना एकेकाळी नकाराचा कटू घोट पचवावा लागला असेल, यावर विश्वास बसत नाही. पण हे खरं आहे. सुरूवातीच्या काळात अमिताभची उंची आणि त्याची आवाज यामुळे त्याला अनेकदा नकार मिळाले. अर्थात पुढे याच दोन गोष्टींनी त्याला लीजेंड बनवलं, हेही तितकंच खरं.2 / 9 शाहरूख खान आज अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे. छोट्या पडद्यावर सुरूवात करणाºया शाहरूखला आज किंगखान म्हणून ओळखलं जातं. पण सुरूवातीला त्याच्या कामाची जराही दखल घेतली गेली नाही. नाक धबाडं आहे म्हणून त्याला टीकाही सहन करावी लागली होती.3 / 9नवाजुद्दीन सिद्दीकी किती हरहुन्नरी स्टार आहे, हे नव्यानं सांगायची गरज नाही. पण कधीकाळी चेहºयामुळं त्याला नको त्या गोष्टी ऐकाव्या लागल्या होत्या. किरकोळ शरीरयष्टी आणि सुमार चेहरा यामुळे अनेक निर्मात्यांनी त्याला उभंही केलं नव्हतं. आज तोच मोठा स्टार आहे.4 / 9कतरिना कैफ आज बॉलिवूडची महागडी अभिनेत्री आहे. पण सुरूवातीला बॉलिवूडमध्ये आली तेव्हा तिला हिंदी बोलता येत नाही म्हणून अनेकजण तिची खिल्ली उडवत होते. अनेक चित्रपटांत यामुळे तिला काम नाकारलं गेलं होतं.5 / 9अनुष्का शर्मालाही सुरूवातीला अनेक नकर पचवावे लागलेत. तू हिरोईन मटेरियल नाहीस, म्हणून तिला निर्माते चक्क तोंडावर नकार देत. पण अनुष्का जिद्दीने काम करत राहिली अन् बॉलिवूडची आघाडीची स्टार बनली.6 / 9अजय देवगण यालाही त्याच्या रंगरूपामुळे हेटाळणी सहन करावी लागली. वीरू देवगणसारख्या बड्या अॅक्शन डायरेक्टरचा मुलगा असूनही त्याच्या सामान्य चेहºयामुळे सुरूवातीच्या काळात तो नाकारला गेला.7 / 9रणवीर सिंग यालाही एकेकाळी नकार पचवावे लागलेत. होय, उत्तर भारतीयासारखा लुक आहे, चक्क या कारणानं त्याला नाकारलं गेलं. पण आज रणवीर बॉलिवूडचा टॉपचा हिरो आहे.8 / 9बॉलिवूडमध्ये येण्याआधी अर्जुन कपूर प्रचंड ‘वजनदार’ होता. होय, त्याच्या वजनामुळे लोक त्याची खिल्ली उडवायचे. पण अर्जुनने अतिशय मेहनतीने यावर मात करत, बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.9 / 9कोंकणा सेन शर्मा हिलाही सुरूवातीच्या काळात तिच्या सावळ्या रंगामुळे अनेक नकार गिळावे लागले. पण सशक्त अभिनयाच्या जोरावर कोंकणाने स्वत:ला सिद्ध केलं.