Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळ्या अभिनेत्रीची अधुरी प्रेमकहाणी, पहिलं लग्न मोडलं, दुसरं नातं नाही टिकलं; आता जगतेय एकाकी आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 16:41 IST

1 / 7
'भाभीजी घर पर है' या टीव्ही मालिकेने शिल्पा शिंदेला वेगळी ओळख दिली. अंगूरी भाभीची व्यक्तिरेखा शिल्पाला प्रत्येक घरात घेऊन गेली.
2 / 7
शिल्पा शिंदेच्या अभिनयापासून ते तिच्या बोलण्याच्या पद्धतीपर्यंत तिने चाहत्यांना अभिनेत्रीचे वेड लावले. पण, शिल्पा शिंदे तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते.
3 / 7
शिल्पा शिंदे पहिल्यांदाच अभिनेता रोमित राजसोबत रिलेशनशीपमध्ये आली. रोमितसोबत शिल्पाची पहिली भेट मायका या टीव्ही मालिकेच्या सेटवर झाली होती. शिल्पा आणि रोमितचं नातं अगदी एंगेजमेंटपर्यंत पोहोचलं होतं. पण, त्यांचे लग्न झालेच नाही.
4 / 7
एंगेजमेंटनंतर काही वेळातच शिल्पाचे रोमितसोबत ब्रेकअप झाले होते, त्यामुळे एंगेजमेंटही तुटली होती. एंगेजमेंट तुटल्यानंतर शिल्पा शिंदे किंवा रोमित राज या दोघांनीही यावर काहीही सांगितले नव्हते.
5 / 7
मात्र काही वर्षांनंतर शिल्पाने एका मुलाखतीत एंगेजमेंट तोडण्याचे कारण सांगितले. शिल्पाने सांगितले होते की रोमितने तिच्या कुटुंबीयांचा अपमान केला होता, त्यामुळे तिला नाते तोडावे लागले होते.
6 / 7
रोमित राजसोबतची एंगेजमेंट मोडल्यानंतर शिल्पा शिंदे पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये आली. पण, यावेळीही शिल्पाचे नाते जास्त काळ टिकू शकले नाही. दोनदा प्रेमात अपयशी झाल्यानंतर ही अभिनेत्री आता सिंगल लाईफ जगत आहे.
7 / 7
शिल्पा शिंदेची प्रेमकहाणी दोनदा अपूर्ण राहिली. शिल्पा शिंदे वयाच्या ४६ व्या वर्षीही सिंगल आहे. पण, अभिनेत्री तिच्या सिंगल लाईफचा खूप आनंद घेत आहे. शिल्पा शिंदे सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.
टॅग्स :शिल्पा शिंदे