Join us  

मालदीव नव्हे हे तर लक्षद्वीप! 'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्रीचं बीचवर ग्लॅमरस Photoshoot

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 12:00 PM

1 / 7
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून लक्षद्वीप विरुद्ध मालदीव वाद सुरु आहे. अशातच अनेक सेलिब्रिटींनी मालदीवचे ट्रीप प्लॅनही रद्द केले आहेत. पंतप्रधान मोदींवर मालदीवने केलेल्या टीकेला उत्तर देत अक्षय कुमार, सलमान खान, अमिताभ बच्चनसह अनेक दिग्गजांनी लक्षद्वीप एक्स्लोर करा असं आवाहन केलं आहे.
2 / 7
'ये है मोहोब्बते' या लोकप्रिय टीव्ही मालिकेतील अभिनेत्री कृष्णा मुखर्जीने (Krishna Mukherjee) लक्षद्वीपच्या तिच्या ट्रीपचे फोटो शेअर केले आहेत. तेथील निळ्याशार समुद्रात हॉट फोटोशूट करत तिने सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतलं आहे.
3 / 7
कृष्णा लक्षद्वीपमध्ये एका क्रुझवर असल्याचंही पाहायला मिळत आहे. मालदीव नाही तर आपल्याच देशातलं सर्वात सुंदर आयर्लंड लक्षद्वीपमधील तिचे हे फोटो खूपच सुंदर आहेत.
4 / 7
'शांत राहा आणि लक्षद्वीपला जा, खूप कमी लोकांना माहित असलेलं भारतातलं सर्वात सुंदर ठिकाण' असं कॅप्शनही तिने दिलं आहे. कृष्णाचे हे फोटो जुने असून तिने 'थ्रोबॅक टू लक्षद्वीप' असं लिहिलं आहे.
5 / 7
कृष्णाचे बीचवरील फोटोही सध्या व्हायरल होत आहेत. यात तिचा ग्लॅमरस अवतार चाहत्यांना भलताच आवडलाय. तसंच तिच्या सौंदर्याचीही चाहत्यांनी स्तुती केली आहे.
6 / 7
कृष्णा मुखर्जी गेल्या वर्षी मार्च महिन्यात लग्नबंधनात अडकली. चिराग बाटलीवालासोबत तिचं लव्हमॅरेज झालं. चिराग हा नेव्ही ऑफिसर आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो तेव्हा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
7 / 7
ये है मोहोब्बते मालिकेतील 'आलिया भल्ला'या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. यानंतर कृष्णा 'नागिन', 'शुभ शगुन' या मालिकांमध्येही दिसली. सध्या ती फॅमिली टाईम एन्जॉय करत आहे.
टॅग्स :लक्षद्वीपये है मोहब्बतेंटिव्ही कलाकारव्हायरल फोटोज्