Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ye Hain Mohabbatein फेम अभिनेत्रीला बॉयफ्रेंडने शर्टलेस होऊन लग्नासाठी केलं प्रपोज, तिनं दिलं असं उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 14:45 IST

1 / 6
ये हे मोहब्बते फेम अभिनेत्री कृष्णा मुखर्जी सध्या आपलं फेअरी टेल वालं जीवन जगत आहे. ती मर्चेंट नेव्ही ऑफिसर चिराग बाटलीवाला याच्याशी विवाह करणार आहे. मात्र लग्नाआधीच्या रिचुअल्सना ती ट्रेडिशनल आणि मॉर्डन पद्धतीने सेलिब्रेट करत आहे. हे फोटो पाहिल्यावर तुमच्याही हृदयाचे ठोके चुकल्याशिवाय राहणार नाहीत.
2 / 6
कुष्णा मुखर्जी हिने हल्लीच तिच्या फॅन्सना तिच्या रोमँटिक वेडिंग प्रपोजलची झलक दाखवली आहे. हे फोटो पाहून वातावरणही रोमँटिक झाले. चिरागने कुष्णासाठी हे खास प्रपोजल छोट्याशा बोटीवर प्लॅन केले होते.
3 / 6
कृष्णा मुखर्जीने तिच्या इन्स्टावर चिरागसोबत अनेक रोमँटिक फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये तुम्ही तिच्या ड्रिमी लव्ह लाईफची झलक पाहू शकता. चिराग ब्लाईंडफोल्ड करून कृष्णाला घेऊन जाताना दिसत आहेत. कृष्णा खूप उत्सुक दिसत आहे. नंतर चिराग कृष्णासमोर गुडघ्यांवर बसलेला दिसत आहे.
4 / 6
त्यानंतर चिराग बाटलीवाला शर्टलेस होऊन आपली बॉडी दाखवताना दिसत आहे. त्यावर विल यू मॅरी मी? असा प्रश्न विचारलेला आहे. तर त्याला उत्तरदाखल कृष्णाने यस या पर्यायावर टिक केली आहे. हा आनंदाचा क्षण दोघेही मिळून सेलिब्रेट करताना दिसत आहेत. तर कृष्णासुद्धा चिरागला सर्वांसमोर किस करताना दिसत आहे.
5 / 6
चिरागला किस करताना कृष्णा मुखर्जीने तिला विवाहासाठी होकार दिला आहे. चिरागने कृष्णा मुखर्जीला इंप्रेस करण्यासाठी कुठलीही कसर सोडलेली नाही. रोमँटिक होत कृष्णाने चिरागसोबत खूप जबरदस्त फोटो काढले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांमध्ये हरवलेले दिसत आहेत.
6 / 6
अभिनेत्रीने हे रोमँटिक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. त्यात लिहिलेय की चला लग्न करूया. कृष्णा मुखर्जीने आपल्या या खास रोमँटिक प्रपोजलदरम्यान, ब्लॅक मिनी ड्रेस घातला आहे. त्यावर व्हाइट फ्लकी स्लीव्ह होते. ते त्यांच्या आऊटफिलटा ग्लॅमरस टच देत होते.
टॅग्स :ये है मोहब्बतेंसेलिब्रिटी