Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 15:22 IST
1 / 11महाकुंभमधून व्हायरल झालेली मॉडेल आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर तान्या मित्तलने आता बिग बॉस १९ मध्ये एन्ट्री केली आहे. ती फक्त २५ वर्षांची आहे आणि सर्वात तरुण श्रीमंत सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असल्याचं म्हटलं जातं. 2 / 11तान्याने आपल्या करियरची सुरुवात फक्त ५०० रुपयांपासून केली होती आणि आज ती केवळ एक इन्फ्लुएंसरच नाही तर एक सक्सेसफुल बिझनेस वुमन देखील आहे.3 / 11तान्या मिस एशिया टुरिझम युनिव्हर्स २०१८ आहे. ती तिच्या सोशल मीडिया व्हिडिओंद्वारे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश पर्यटनाला प्रोत्साहन देते.4 / 11तान्या मित्तलचा जन्म २७ सप्टेंबर १९९८ रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला. तिने फक्त १२ वी पर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर तिने इंग्रजी शिकण्यावर पूर्ण भर दिला. आजच्या काळात इंग्रजी शिकणं आवश्यक असल्याचं तिचं मत आहे.5 / 11एका मुलाखतीत तान्याने सांगितलं की, ती दिल्लीतील सदर बाजार येथून वस्तू खरेदी करायची. खरेदी केलेल्या वस्तूंचे फोटो तिच्या अकाउंटवर पोस्ट करून ती विकत असे.6 / 11तान्याने हँडमेड लव्ह नावाने क्राफ्टचा व्यवसाय सुरू केला. जिथे ती फोटो फ्रेम, गिफ्ट कार्ड, रिंग यासारख्या हँडमेड वस्तू बनवायची. सुरुवातीला तिला ग्राहक मिळाले नाहीत. नंतर तिने सोशल मीडियाद्वारे आपला व्यवसाय वाढवला.7 / 11तान्याने २०१७ मध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केला, तर २०१८ मध्ये तिने फॅशन इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला आणि मिस टुरिझम एशिया झाली आणि लेबनॉनमध्ये १२ दिवस चाललेल्या या स्पर्धेत तान्याने ३१ देशांतील मॉडेल्सना हरवलं.8 / 11तान्याने म्हटलं की, तिला इंग्रजी येत नव्हते पण तिचा व्यवसाय वाढवण्यासाठी ती यूट्यूबच्या मदतीने इंग्रजी शिकले. त्यानंतर तिचा व्यवसाय वाढवण्यासाठी तान्याने धार्मिक स्थळांचा प्रचार करण्यासाठी व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली.9 / 11तान्याने २०० हून अधिक मुलींना दत्तक घेतलं आहे आणि तिने त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. ती तिच्या कारखान्याद्वारे अनेक लोकांना रोजगारही देत आहे.10 / 11तान्या मित्तलचे इन्स्टाग्रामवर ३ मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याच वेळी तिच्या यूट्यूब चॅनेलवर तिचे ६८.७ हजार सबस्क्राइबर्स आहेत. जिथे ती पॉडकास्टपासून ते धार्मिक स्थळांपर्यंत व्हिडीओ बनवते.11 / 11महाकुंभमेळ्यादरम्यान तान्या मित्तल प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्यावेळी तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती रडत चेंगराचेंगरीची परिस्थिती वर्णन करत होती.