Join us
Daily Top 2Weekly Top 5

Yuzvendra Chahal सोबत नाव जोडलं जाणारी Shefali Bagga कोण आहे? क्रिकेटशी आहे खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 16:16 IST

1 / 9
भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आलाय. गेल्या वर्षी त्याचा धनश्री वर्माशी घटस्फोट झाला.
2 / 9
त्यानंतर चहल आरजे महवशला डेट करत असल्याचाही चर्चा रंगल्या. पण काही दिवसांपूर्वीच त्यांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आल्या.
3 / 9
तशातच नुकताच युजवेंद्र चहल आणखी एका सुंदरीसोबत दिसला. दोघेही एका हॉटेलमधून डिनर करून बाहेर पडले आणि कॅमेरात कैद झाले.
4 / 9
व्हिडिओमुळे सोशल मीडियावर युजवेंद्र चहलबद्दल जिच्यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगली ती म्हणजे, शेफाली बग्गा. जाणून घेऊया कोण आहे ती?
5 / 9
शेफाली बग्गाबद्दल बोलायचे झाले तर, ती एक अँकर आणि सोशल मीडिया सेलिब्रिटी आहे. इंटरनेटवर शेफाली बरीच लोकप्रिय आहे.
6 / 9
२०१९मध्ये शेफाली बग्गा खूप चर्चेत होती. त्यावर्षी तिने बिग बॉस १३ मध्ये प्रवेश केला होता, ज्यामुळे ती टीव्हीतून चाहत्यांचा घरात पोहोचली.
7 / 9
शहनाज गिलसोबतची तिची मैत्री चांगलीच चर्चेत राहिली. तसेच त्या सीझनचा विजेता दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबतही तिची चांगली मैत्री होती.
8 / 9
बिग बॉसनंतर ती मॉडेलिंग आणि टीव्ही क्षेत्रात अधिक सक्रीय झाली. अनेक क्रिकेट स्पर्धांमध्येही तिने अँकरिंग केले. तेथेच या दोघांची मैत्री झाल्याची शक्यता आहे.
9 / 9
युजवेंद्र आणि शेफाली या दोघांच्या त्या व्हिडीओवरून ते दोघे डेट करत असल्याची चर्चा सुरु असली तरीही अद्याप त्या दोघांकडून यावर प्रतिक्रिया आलेली नाही.
टॅग्स :युजवेंद्र चहलसोशल मीडियासोशल व्हायरलव्हायरल व्हिडिओबिग बॉस १९ऑफ द फिल्डशेफाली बग्गा