अजून आठवतं जेव्हा चोरून ऑडिशनला जायचे..., सोनाली पाटीलची लाडक्या ‘कला’साठी स्पेशल पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 17:10 IST
1 / 8‘बिग बॉस मराठी 3’ या शोमुळे सोनाली पाटील घराघरात पोहोचली. तिची लोकप्रियता प्रचंड वाढली. आज सोनाली पाटील हिची नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही.2 / 8कोल्हापुरात राहणारी सोनाली ‘टिकटॉक’ गर्ल म्हणून ओळखली जायची. ‘वैजू नंबर वन’ या मालिकेतून तिने मराठी कलाविश्वात पदार्पण केलं.3 / 8अनेक छोट्या छोट्या भूमिका करून तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. यामागे तिचा खूप मोठा स्ट्रगल आहे. खूप सारे कष्ट आहेत.4 / 8आज सोनाली जी काही आहे, ती तिच्या आईमुळे. होय, आईने सोनालीच्या स्वप्नांना नवी उभारी दिली. तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.5 / 8वडिलांना आवडायचं नाही म्हणून सोनाली चोरून ऑडिशनला जायची. तेव्हा आईनेच तिची पाठराखण केली. त्यामुळेच सोनाली आई आत्तापर्यंतच्या प्रवासात साथ देणारी मैत्रिण मानते.6 / 8 महिला दिनी सोनालीने आईसाठी खास पोस्ट शेअर केली. त्यात तिने आईबद्दल भरभरून लिहिलं आहे. तुझ्यातील ‘कला’ (सोनालीची आज्जी तिच्या आईला कलाबाई बोलावते)माझ्यात उतरली, असं म्हणत या पोस्टमध्ये तिने आईचे आभार मानले आहेत.7 / 8 सोनालीने जुळता जुळता जुळतयं की, घाडगे अँड सून, देव पावला, देवमाणूस यासारख्या मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. 8 / 8 बिग बॉस मराठी 3 मध्ये तिने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. मीनलसोबत सोना-मोनाची जोडी लोकप्रिय ठरली होती. शेवटच्या काही आठवड्यात मात्र विशालसोबत वारंवार उडणाºया खटक्यांमुळे ती काहीशी हिरमुसली होती.