वजन घटवायचंय? भारती सिंगने या ७ टिप्स फॉलो करून घटवलं २० किलो वजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 12:35 IST
1 / 13टेलिव्हिजनवरील लाफ्टर क्वीन भारती सिंगने तिच्या वेट लॉस ट्रान्सफॉर्मेशनने सर्वांना हैराण केले आहे. 2 / 13भारती सिंगने तिच्या बाळाच्या जन्माआधी जवळपास २० किलो वजन घटविले होते. तिचा हा वजन घटवण्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. 3 / 13भारतीने तिच्या मजेशीर अंदाजाने फक्त लोकांना हसविलेच नाही तर तिने कोणतीही गोष्ट अशक्य नसते हे देखील सिद्ध करुन दाखविले आहे.4 / 13भारती सिंगचे पूर्वी ९१ किलो वजन होते आणि तिने काही महिने कठोर परिश्रम करून ७१ किलो वजन केले आहे. इतकेच नाही तर दिवसेंदिवस ती फिट होत चालली आहे.5 / 13आज आम्ही तुम्हाला भारती सिंगच्या फिटनेसचं सीक्रेट आणि डाएट प्लान सांगत आहोत. जो फॉलो करून ती फॅट टू फिट झालीय.6 / 13वेट लॉस जर्नीबद्दल सांगताना भारतीने म्हटले होते की, मी माझे खूप वजन कमी केले आहे. त्यामुळे वास्तविकमध्ये मी खूश आहे कारण मला स्वतःला स्वस्थ आणि फिट वाटते. आता मला श्वास घ्यायला त्रास होत नाही आणि हलके वाटते.7 / 13वजन घटवण्यासाठी भारतीने 'इंटरमिटंट फास्टिंग'चा अवलंब केलाय. १६ तास उपवास आणि ८ तास भोजन करण्याचा नियम आहे. म्हणजे रात्रीचे जेवण झाल्यावर थेट दुपारचे जेवण करते. इंटरमिटंट फास्टिंगमुळे वजन कमी होण्यास मदत होते.8 / 13भारती सिंगने वजन घटवण्यादरम्यान बाहेरचे जंक फूड पूर्णपणे बंद केले होते. ती फक्त घरी बनलेले जेवण खात होती.9 / 13वजन कमी करण्यासाठी पूर्ण झोप घ्यावी लागते. म्हणजेच शरीर निरोगी ठेवण्यासाठी ७ ते ८ तासांची झोप आवश्यक असते.10 / 13वजन कमी करण्यासाठी, योगासने आणि स्ट्रेचिंगने सुरुवात करा आणि नंतर भारती सिंगप्रमाणे तुमच्या व्यायामाची तीव्रता हळूहळू वाढवा.11 / 13जर तुम्हाला लवकर वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला तणावापासून दूर राहावे लागेल.12 / 13वजन कमी करण्यासाठी दिवसातून किमान २-३ लिटर पाणी प्या. भारतीने हा तिच्या दिनक्रमाचा एक भाग बनवला आणि त्याचा तिला खूप फायदा झाला.13 / 13भारती सांगते की, वजन कमी करण्याचा सर्वात मोठा मंत्र म्हणजे 'संयम आणि सकारात्मक विचार'. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार ठेवा.