By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 15:29 IST
1 / 9उर्फी जावेद चित्रविचित्र फॅशनमुळे चर्चेत येत असते. 2 / 9चित्रविचित्र आउटफिटमुळे उर्फी जावेदला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. 3 / 9दरम्यान आता उर्फी जावेदला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या आहेत.4 / 9उर्फी जावेद तिच्या स्पष्टोवक्ते शैलीसाठी प्रसिद्ध आहे. ती जितके बोल्ड आउटफिट्स घालते तितकीच ती बोल्ड स्टेटमेंट्स करते. 5 / 9उर्फी जावेदने इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. उर्फी लिहितात, ही व्यक्ती तीन वर्षांपूर्वी माझा ब्रोकर होता. अचानक त्याने मला मेसेज पाठवायला सुरुवात केली. यामध्ये मला फोन करून बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिली. अशा लोकांची अडचण काय आहे ते तुम्ही समजू शकता.6 / 9उर्फी जावेद म्हणाली की मी भारतात नाही. नाहीतर मी नक्कीच तक्रार करेल. पण कोणीही फोन करून बलात्काराची धमकी कशी देते हे तुम्ही समजून घ्याल अशी आशा आहे. मला रोज अशा धमक्या येत असल्याचे उर्फीचे म्हणणे आहे. त्यामुळेच आता काही फरक पडत नाही.7 / 9उर्फी जावेदला अशा धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही उर्फी जावेदला अशा अनेक धमक्या देण्यात आल्या आहेत. 8 / 9उर्फी जावेद प्रत्येक वेळी सोशल मीडियावर या ट्रोलर्सना प्रत्युत्तर देते. 9 / 9काही काळापूर्वी काही महाविद्यालयीन मुलांनी उर्फी जावेदला फोन करून त्रास देण्याचाही प्रयत्न केला होता. यानंतर उर्फीने त्या मुलांविरोधात सोशल मीडियावर पोस्ट केली.